उरणमध्ये पाण्यासाठी दाही दिशा

By admin | Published: April 12, 2015 11:30 PM2015-04-12T23:30:45+5:302015-04-12T23:30:45+5:30

अनेक प्रकल्प, अनेक कंपन्या, मोठमोठ्या वसाहती असूनही उरणमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.

Right direction for water in Uran | उरणमध्ये पाण्यासाठी दाही दिशा

उरणमध्ये पाण्यासाठी दाही दिशा

Next

उरण : अनेक प्रकल्प, अनेक कंपन्या, मोठमोठ्या वसाहती असूनही उरणमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. शीतपेयांच्या दुकानात गर्दी वाढलेली आहे. मात्र हे सर्व सहन करतानाच उरणमधील नागरिकांना भर उन्हात पाणी समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक नळाच्या ठिकाणी पाण्यासाठी मोठमोठाल्या रांगा लागत असून त्यातून भांडणेही ओढवण्याचे प्रकार होत आहेत.
करंजा तसेच उरणमधील प्रसिद्ध बंदर व गावही अनेक प्रवासी पर्यटक याच बंदरातून पुढे अलिबागला जातात. करंजा हे गाव एकूण सात पाड्यांचे मिळून तयार झालेले आहे. जिल्ह्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावात आज मात्र महिलावर्ग पाण्यासाठी वणवण करताना दिसतात. पाण्याच्या या प्रश्नाकडे ना लोकप्रतिनिधी बघत, ना अधिकारीवर्ग.
चाणजे ग्रुपमधील सात पाड्यांचा मिळून बनलेल्या करंजा गावामध्ये ८ ते १० दिवसातून तेही अर्धा ते एक तास आणि कधीकधी रात्री, अपरात्री पाणी सोडले होते. सिडकोने लाखो रुपये खर्चून सुरू केलेल्या नळ योजनेचा गावाला काडीमात्रही फायदा झालेला नाही.
प्रत्येक पाड्यामध्ये सिडकोने पाण्याच्या टाक्या बांधल्या, मात्र या टाकीत पाणीच येत नसल्याने त्या टाक्या केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यातही पाण्याचा वापर वाढल्याने त्याचा ताण विहिरी व बोअरवेलवरही पडला आहे. आता विहीर व बोअरवेलचे पाणीही कमी होत चालले आहे. (वार्ताहर)

Web Title: Right direction for water in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.