Join us  

अभी तो मैं ‘जवान’ हूँ...

By admin | Published: February 22, 2017 7:14 AM

तरुणांनी मतदानासाठी बाहेर पडावे आणि उत्साह दाखवावा, यासाठी वेळोवेळी जनजागृती केली जात असतानाच

मुंबई : तरुणांनी मतदानासाठी बाहेर पडावे आणि उत्साह दाखवावा, यासाठी वेळोवेळी जनजागृती केली जात असतानाच, तरुणांनाही आदर्श ठरेल असे दृश्य घाटकोपर पूर्वमधील शिशुविकास केंद्रातील मतदार केंद्रावर पाहण्यास मिळाले. चालताही येत नसलेल्या आणि कंबरेतून वाकलेल्या एका या ९३ वर्षीय ‘आजोबांनी’उत्साहीपणे मतदानाचा हक्क बजावला. वृद्धापकाळामुळे चालताही येत नसताना मतदान करायला का आलात? असा प्रश्न विचारल्यावर, लागलीच ‘अभी तो मैं ‘जवान’ हूँ’ असे उत्तर देत, प्रश्न विचारणाऱ्याचे तोंड बंद केले.एकीकडे मतदान करा, असे आवाहन सरकारी यंत्रणांना सतत करावे लागत आहे. तरीही लोक घराबाहेर पडून मतदान करण्यासाठी तयार होत नाहीत. मात्र, या सर्वांना चपराक बसेल, असे काम घाटकोपरचे ९३ वर्षीय जिगर प्रभुदास पटेल यांनी केले आहे. भर दुपारी घरी बसून राहून आराम करण्याऐवजी, या आजोबांनी मतदार केंद्रावर येऊन मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. कंबरेतून वाकलेले, धड बोलताही येत नसलेल्या या आजोबांनी नातवाचा हात धरून मतदान केंद्र गाठले.‘मतदान तर करणार... हा माझा हक्क आहे... अभी तो मैं जवाँ हूँ. जब तक जान तब तक व्होट करेंगे,’ असे म्हणत पटेल आजोबांनी तरुणांनाच लाजवले आहे. ‘एन’ वॉर्डमधील पंतनगर येथील महापालिका शाळा क्र. २ मध्येही सकाळी सकाळीच अनेक वरिष्ठ नागरिकांनी मतदानासाठी उपस्थिती राहून मतदानाचे कर्तव्य पार पाडले. (प्रतिनिधी)