- कुलदीप घायवटपश्चिम रेल्वे मार्गावर पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस १७ जानेवारी रोजी उद्घाटनानिमित्त अहमदाबाद - मुंबईदरम्यान धावली. खासगी एक्स्प्रेसच्या विरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात आली. तर, काही रेल्वे कामगार नेत्यांना संघटनेच्या कार्यालयातूनच ताब्यात घेण्यात आले. दडपशाही चालवून रेल्वे कामगारांचे हक्क डावलले जात आहेत. सरकारी रेल्वे सेवा असताना खासगी एक्स्प्रेस चालवून प्रवाशांची लूट केली जात आहे, असे मत वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे मुंबई अध्यक्ष किरण पाटील यांनी व्यक्त केले.खासगीकरणामुळे रेल्वे कामगारांचे हक्क डावलले जात आहेत का?खासगीकरणामुळे रेल्वे कामगारांचे हक्क, सुविधा डावलल्या जात आहेत. कंत्राटी काम करणाºया कामगारांना त्यांच्या पगारासाठी, साप्ताहिक सुट्टीसाठी, इतर सुविधांसाठी झटावे लागते. याविरोधात आवाज उठविणाºयाला कामावरून कमी केले जाते.प्रश्न : खासगीकरणाने प्रवाशांची लूट होईल का?भारतीय रेल्वे सेवा ही सर्वसामान्य प्रवाशांची आहे. यातून सर्व जण प्रवास करू शकतात. मात्र खासगीकरणामुळे प्रवाशांची लूट होणार आहे. इतर एक्स्प्रेसच्या तुलनेत खासगी एक्स्प्रेसचे तिकीटदर जास्त आहेत. हे तिकीटदर सुट्टीच्या काळात अधिक वाढणार आहेत. भारतीय रेल्वेमध्ये देशातील जवानांना, पोलिसांना, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना व इतर प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. मात्र खासगी एक्स्प्रेसमध्ये अशा प्रकारची कोणतीही सुविधा देण्यात येणार नाही. या सर्व मुद्द्यांबाबत कर्मचारी संघटना प्र्रवाशांमध्ये जनजागृती करणार आहे.प्रश्न : आयआरसीटीसी योग्यरीत्या खासगी ट्रेन चालविण्यात यशस्वी होईलका?आयआरसीटीसीद्वारे खासगी ट्रेन चालविण्यात येत आहेत. आयआरसीटीसीला अन्नपदार्थ बनविता येत नाहीत. ते कशा प्रकारे ट्रेन चालविणार आहेत? विषबाधा झालेले अन्नपदार्थ प्रवाशांना दिले जातात. काळ्या यादीत नाव असलेल्या कंत्राटदारांना वारंवार कंत्राटे दिली जातात. अशीच व्यवस्था खासगी ट्रेनमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. यासह खासगी एक्स्प्रेसमुळे चोरीच्या घटना, मद्याची वाहतूक होण्याची शक्यता आहे.प्रश्न : दुसºया खासगी एक्स्प्रेसनंतर पुढील रणनीती काय असणार आहे?अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेसच्या विरोधात शांततेने विरोधात करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अहमदाबाद, सुरत, वडोदरा येथील कर्मचाºयांच्या नेत्यांना अटक केली. त्यामुळे लोकशाही असलेल्या देशात दडपशाही सुरू आहे. खासगीकरणाचा आता तीव्र विरोध केला जाणार आहे. देशातील सर्व संघटना एकत्र येऊन याचा निषेध करणार आहेत.
खासगीकरणाने डावलले कामगारांचे हक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 7:04 AM