नवीन वर्षात धूमधडाक्यात उडवून टाका लग्नाचा बार; असे आहेत मुहूर्त...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 10:27 AM2023-12-18T10:27:12+5:302023-12-18T10:27:51+5:30
विवाह हटके पद्धतीने करण्यासाठी लॉन्स, हॉटेल बुक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्ष २०२३ संपायला अवघे पंधरा दिवस शिल्लक असून, २०२३ या वर्षात अधिक मासामुळे अनेक जोडप्यांचा विवाह सोहळा लांबणीवर पडला होता. मार्च, एप्रिल महिन्यात विवाह मुहूर्त एकही नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांना विवाह करता आला नाही. आता मात्र नवीन वर्षात इच्छुक जोडप्यांना धूमधडाक्यात कार्य उरकता येणार आहे.
२०२३ मध्ये जानेवारी, फेब्रुवारीनंतर विवाहासाठी थेट मे महिन्यात मुहूर्त होते. मात्र, मे महिन्यातील उकाडा आणि आधीच फुल झालेले हॉल पाहता अनेक जोडप्यांनी आपले लग्न पुढे ढकलले. जूनमध्ये मुहूर्त असले तरी विवाहासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांनी पावसाळ्यानंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यातच अधिक मास आला. इतकेच काय तर पितृपक्षामुळेदेखील अनेक विवाह रखडले होते. आता नवीन वर्षात जोडप्यांना विवाह करता येणार आहे.
हॉटेलवर वरात
अनेकांचा विवाह पारंपरिक पद्धतीने हॉल किंवा मोकळ्या मैदानावर होतो. मात्र, आपला विवाह हटके पद्धतीने व्हावे यासाठी लॉन्स, हॉटेल बुक करण्याचा बेत काही मंडळींनी आखला आहे.
त्याचेही नियोजित बुकिंग झाले असून लॉन्स, हॉटेलवर सनई, चौघड्याचा आवाज निनादणार आहे.
लग्नाची वरात काढताना गाण्यावर थिरकण्यासाठी, वऱ्हाडी मंडळींना नाचवण्यासाठी डीजेची बुकिंग करण्यात आली आहे.
हे आहेत २०२४ मधील विवाह मुहूर्त
जानेवारी : २, ३, ४, ५, ६, ८, १७, २२, २७
फेब्रुवारी : १, २, ४, ६, १२, १३, १७, १८, २४, २६, २७, २८, २९
मार्च : ३, ४, ६, १६, १७, २६, २७, ३०
एप्रिल : १, ३, ५, १८, २०, २१, २२, २६, २८
मे : १, २
जून : २९, ३०
जुलै : ९, ११, १२, १३, १४, १५, १९, २१, २२, २३, २५, २६, २७, २८, ३०, ३१
ऑगस्ट : १०, १३, १४, १६, १८, १९, २३, २७, २८
सप्टेंबर : ५, ६, १४, १५, १६
ऑक्टोबर : ७, ९, ११, १२, १३, १६, १७, १८, २१, २६
नोव्हेंबर : १७, २२, २३, २५, २६, २७
डिसेंबर : ३, ४, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २३, २४, २६