रिंकी खन्ना यांना मिळाला दिलासा

By admin | Published: March 20, 2015 02:08 AM2015-03-20T02:08:42+5:302015-03-20T02:08:42+5:30

अनिता अडवाणी यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीतून रिंकी खन्ना यांचे नाव वगळण्याचे आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने अडवाणी यांना दिले़

Rinke Khanna gets relief | रिंकी खन्ना यांना मिळाला दिलासा

रिंकी खन्ना यांना मिळाला दिलासा

Next

मुंबई : दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याचा दावा करणाऱ्या अनिता अडवाणी यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीतून रिंकी खन्ना यांचे नाव वगळण्याचे आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने अडवाणी यांना दिले़
न्या़ एम़एल़ ताहिलयानी यांनी हे आदेश दिले़ रिंकी ही राजेश खन्ना यांची मुलगी असली तरी तिचा आता विवाह झाला असून, ती सध्या कोलकाता येथे असते़ त्यामुळे तिच्याविरोधात अशी तक्रार करणे योग्य नाही़ तेव्हा तिचे नाव यातून वगळावे़
तसेच अभिनेता अक्षय कुमार व त्याची पत्नी टिष्ट्वंकल यांच्याविरोधातील तक्रारदेखील मागे घ्यावी, अशी सूचना न्यायालयाने अडवाणी यांना केली़ सुपरस्टार राजेश खन्ना यांचे १८ जुलै २०१२ रोजी निधन झाले़ राजेश खन्ना यांच्यासोबत आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो़ त्यामुळे अभिनेत्री डिंपल कपाडिया, अक्षयकुमार, टिष्ट्वंकल व रिंकी खन्ना यांनी देखभाल खर्च तसेच वांद्रे येथे घर द्यावे, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात केला आहे़
अडवाणी यांनी या कलाकारांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचीही तक्रार केली आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने या
सर्व कलाकारांना नोटीस जारी
केली़ ही तक्रार रद्द करण्यासाठी या सर्वांनी स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात केली आहे़ त्यावर एकत्रितपणे सुनावणी सुरू आहे़ (प्रतिनिधी)

अडवाणी यांनी रिंकी यांचे नाव तक्रारीतून वगळण्यास संमती दर्शवली़ मात्र राजेश खन्ना यांचे निधन झल्यानंतर त्यांच्या आशीर्वाद बंगल्यातून मला बाहेर काढण्यात अक्षय व टिष्ट्वंकल पुढे होते़त्यामुळे त्यांचे नाव तक्रारीतून वगळणार नाही, असे अडवाणी यांनी स्पष्ट केले़ अखेर न्यायालयाने केवळ रिंकी यांचे नाव तक्रारीतून वगळण्याचे आदेश देत ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली़

Web Title: Rinke Khanna gets relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.