प्रसूतीपूर्वी अर्भकाला कोविडचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:06 AM2021-07-27T04:06:57+5:302021-07-27T04:06:57+5:30

नॅशनल नेनाॅटाॅलोजी फोरमच्या संशोधन अहवालातील निरीक्षण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रसूतीपूर्वी अर्भकाला कोविडचा धोका असल्याचे निरीक्षण नॅशनल नेनाॅटाॅलोजी ...

Risk of covid in infants before delivery | प्रसूतीपूर्वी अर्भकाला कोविडचा धोका

प्रसूतीपूर्वी अर्भकाला कोविडचा धोका

Next

नॅशनल नेनाॅटाॅलोजी फोरमच्या संशोधन अहवालातील निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रसूतीपूर्वी अर्भकाला कोविडचा धोका असल्याचे निरीक्षण नॅशनल नेनाॅटाॅलोजी फोरमच्या संशोधन अहवालाता मांडण्यात आले आहे. यामुळे मूदतपूर्व प्रसूतीदरम्यान अर्भकाचा मृत्यू होण्याची शक्यता असते असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.

कोविडदरम्यान गर्भधारणा झालेल्या नवजात बाळांमध्ये श्वसनविकार, सहव्याधी असल्याचे आढळले आहे. परंतु, प्रसूती झालेल्या बाळांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. प्रसूती झाल्यानंतर ७२ तासांच्या कालावधीत बाळाचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आल्यास हा संसर्ग गर्भाशयातून झाल्याचे समजते.

या अभ्यास अहवालात देशभरातील २० रुग्णालयांतील नवजात बालकांचा सहभाग आहे. या अहवालात सहभागी झालेल्या बाळांमध्ये कोविड चाचणी केंद्राच्या आवारात झालेल्या प्रसूती आणि या कक्षाच्या बाहेर झालेल्या प्रसूती अशा दोहोंचा समावेश आहे. प्रसूतीनंतर बाळाची कोरोना चाचणी न करणे वैद्यकीयदृष्ट्या नवजात बालकाच्या आरोग्याला धोकादायक ठरु शकते असे डॉक्टरांनी या अहवालात नमूद केले आहे.

या संशोधन अहवालाविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आनंद किशोर यांनी सांगितले, कोविडच्या संसर्गादरम्यान अनेक गर्भवतींच्या सुखरुप प्रसूतीही झाल्या आहेत. शिवाय, त्याची नवजात बालकेही सुदृढ आहेत. मात्र कोविडच्या संसर्गाचा धोका टळलेला नाही, त्यामुळे गर्भवतींनी या काळात संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने अधिक सर्तक आणि सुरक्षित राहिले पाहिजे. तपासणी, वैद्यकीय चाचण्यांदरम्यान कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, स्वच्छतेविषयक सर्व नियमही पाळले पाहिजेत. प्रसूतीच्या वेळी कोरोना चाचणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Web Title: Risk of covid in infants before delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.