पूजा दामले - मुंबई
एका झोक्यावरून दुस:या झोक्यावर जाणो, दोरीवरून सायकल चालवणो, एका चाकावर सायकल बॅलन्स करणो असे खेळ सादर करून मनोरंजन करणा:या सर्कसीचे आर्थिक गणित आता महागाईमुळे चांगलेच कोलमडत चालले आहे. वाढत्या महागाईच्या प्रमाणात मिळकत होत नसल्याने सर्कशीचे भवितव्य धोक्यात असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
रोज होणा:या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांप्रमाणो सर्कस मालकही महागाईचे शिकार बनले आहेत. भारतामध्ये अजूनही सर्कशीला कलेचे अथवा खेळाचे स्थान मिळाले नसल्यामुळे सरकारकडून सर्कसला अल्पप्रमाणात मदत होते. संपूर्ण भारतामध्ये आत्ताच्या घडीला केवळ 35 ते 4क् सर्कस आहेत. यामध्ये 15 ते 18 मोठय़ा असून उर्वरित लहान स्वरूपाच्या आहेत. मोठय़ा सर्कसमध्ये 14क् ते 17क् कलाकार असतात, तर लहान सर्कसमध्ये 3क् ते 5क् कलाकार असतात. मोठय़ा सर्कसचा महिन्याचा खर्च हा 6क् ते 7क् लाखांच्या घरात जातो. तर सर्कस लहान असल्यास हा खर्च अध्र्यावर येतो. दिवसभराच्या खर्चामध्ये मैदानाचे भाडे, नाश्ता, जेवण, दैनंदिन वापरासाठी पाणी, पिण्याचे पाणी, कपडे या सर्व गोष्टींचा समावेश आहे. तर कलाकारांना दिले जाणारे मानधन हे तो कलाकार किती जोखमीची, साहसी कला सादर करतो तसेच त्याच्या ज्येष्ठत्वावर ठरविले जाते. महिन्याला किमान दहा ते कमाल वीस हजार रुपये मानधन एका कलाकाराला मिळते.
शहरांमध्ये येणारा खर्च जास्त असल्यामुळे गावात सर्कस नेण्यास पसंती दिली जाते. मात्र, तिथे तिकीट दर हे कमी ठेवावे लागतात. यामुळे एकूणच आर्थिकघडी विस्कटत चालल्याचे रेम्बो सर्कसचे मालक सुजित दिलीप यांनी सांगितले. इटलीत कलाकारांना कमी पैशांत धान्यपुरवठा होतो. भारतामध्ये अशी सुविधा शासनाकडून मिळत नाही. कलाकाराला आजारपण आल्यास सर्वस्वी खर्च हा सर्कसतर्फे केला जात असल्याचेही दिलीप यांनी सांगितले.
सर्कस थिएटर उभारा
च्सर्कससाठी मैदान मिळत नाही. मिळाले तरी त्याचे रोज भाडे आकारले जाते, जे परवडणारे नसते. यावर उपाय म्हणून एक सर्कस थिएटर दिले पाहिजे. रशियात सर्कस थिएटर आहे. त्याच धर्तीवर सर्कस थिएटर बांधले, तर त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल.
च्सर्कसला एक हक्काची जागा देखील मिळेल. सर्कस कलाकरांसाठी एक संस्था स्थापन करण्याचीही कलाकारांची मागणी आहे. यामुळे नवीन सर्कस कलाकार तयार होतील, असे या कलाकारांचे म्हणणो आहे.
च्महागाईमुळे आर्थिक घडी विस्कटून गेल्या 2क् वर्षात महाराष्ट्र राज्यातील प्रभात, रॉयल, एरिना अशा मोठय़ा सर्कस बंद पडल्या आहेत.