Join us

कांदळवनातून उपजीविका, रोजगारनिर्मिती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 2:28 AM

मुंबई महानगर प्रदेशातील कांदळवनांच्या संरक्षणासह संवर्धनाचे काम वेगाने सुरू असून, कांदळवनाच्या क्षेत्रात समाधानकारक वाढ होत आहे. कांदळवनाच्या संवर्धनासाठी स्वच्छता अभियान हाती घेतले असून, त्यास मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील कांदळवनांच्या संरक्षणासह संवर्धनाचे काम वेगाने सुरू असून, कांदळवनाच्या क्षेत्रात समाधानकारक वाढ होत आहे. कांदळवनाच्या संवर्धनासाठी स्वच्छता अभियान हाती घेतले असून, त्यास मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबईच्या भौगोलिकतेसह पर्यावरणाचा विचार करता कांदळवनाचे संवर्धन होणे ही महत्त्वाची बाब असून, कांदळवनातील अनधिकृत बांधकामांवरही कारवाई सुरू आहे. कांदळवन कक्ष आता मॅनग्रोव्ह फाउंडेशन स्थापन करत ‘ग्रीन क्लायमेट प्रोग्र्रॅम’ हाती घेण्यात येणार आहे. याकडे आम्ही केवळ अभियान म्हणून पाहत नाही तर कांदळवन हे उपजीविकेचे, रोजगारनिर्मितीचे साधन कसे होईल, याचाही विचार आहे. परंतु त्यासाठी केवळ कांदळवन कक्षाने काम करणे पुरेसे नाही तर नागरिकांनी अभियानाला हातभार लावत पर्यावरण संरक्षणासाठी कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे, असे प्रामाणिक मत राज्याच्या वन विभागाच्या कांदळवन कक्षाचे प्रमुख एन. वासुदेवन यांनी ‘लोकमत’चे प्रतिनिधी सचिन लुंगसे यांच्याशी बोलताना व्यक्त केले.तुमच्या कक्षाचा प्रारंभ कसा झाला?मला या क्षेत्रात काम करताना आनंद मिळतो. माझी नियुक्ती जेव्हा या क्षेत्रात झाली तेव्हा आमचे कार्यालय वांद्रे येथे होते. संपूर्ण कार्यालयात एकमेव म्हणून मी कार्यरत होतो. तेव्हा सचिव प्रवीण परदेशी यांनी मला याकामी मदत केली. पण लोक नव्हते. नंतर मात्र लोक कामासाठी पुढाकार घेऊ लागले. आज कुठे हे काम वेगाने सुरू झाले आहे. दरम्यानच्या काळात २०१३ साली काही निर्णय आले. मुंबई आणि नवी मुंबईतील कांदळवनाच्या सुरक्षेसाठी काही निर्णय घेण्यात आले. कांदळवनाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र युनिट स्थापन झाले.कांदळवन अभियान कसे सुरू आहे?राज्याच्या कांदळवन कक्षातर्फे मुंबई शहर आणि उपनगरासह नवी मुंबई परिसरात कांदळवनांच्या संरक्षणासह संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. समुद्रकिनारे स्वच्छ करणे, कांदळवनांतील कचरा गोळा करणे ही कामे प्रामुख्याने या मोहिमेत केली जात आहेत. शनिवारसह रविवारी कांदळवनांमध्ये ही मोहीम राबविली जात असली तरी सोमवारपासून शुक्रवारपर्यंत मोहिमेचे काम सुरू असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्थानिक लोक मोहिमेत सहभागी होतात. शिवाय त्यांच्या जोडीला आमचे स्वयंसेवक आणि कामगारही असतात.कोणाचे साहाय्य घेत आहात?कोणतीही मोहीम अथवा अभियान यशस्वी करायचे झाले तर त्यास इच्छाशक्ती आवश्यक असते. केवळ प्रशासकीय इच्छाशक्ती महत्त्वाची नाही तर लोकांमध्येही जनजागृती होणे गरजेचे आहे. प्राथमिक स्तरावर काम होणे गरजेचे आहे. याचा सारासार विचार करत आम्ही प्राथमिक स्तरातून विचार आणि काम सुरू केले आहे. याकरिता आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्थानिकांची मदत घेतली आहे. दोन महिन्यांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्थानिकांनी दिलेला प्रतिसाद पाहता मोहिमेचे परिणाम सकारात्मक दिसून येत आहेत.अभियानाचे स्वरूप कसे आहे?कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाची मोहीम वेगाने दोन महिन्यांपासून सुरू आहे. चाळीस हजार स्वयंसेवक यासाठी काम करत आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकाची मदत आम्ही याकरिता घेत आहोत. काही ठिकाणी नेतृत्व तयार झाले आहे, तयार होत आहे आणि तयार होणार आहे. महाविद्यालयातल्या एनएसएस युनिटची मदत घेत आहोत. स्थानिकांची याकामी मदत होत आहे. मुंबईत मोहीम सुरू झाली असून, राज्यातही सुरू होत आहे.अभियानात अडचणी येतात?आपण आपले कांदळवन स्वच्छ केले, संरक्षण आणि संवर्धन केले तर आपण याचा पर्यटनासाठी वापर करू शकतो. तुम्ही जर बारकाईने पाहिले तर कांदळवनासाठी वनविभाग काम करत होता. मात्र तुलनेने काम परिपूर्ण होत नव्हते किंवा त्या कामाला मर्यादा येत होत्या. २००५ साली मुंबई उच्च न्यायालयात कांदळवनाबाबत एक याचिका दाखल झाली होती. या वेळी याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने कांदळवनाचे संवर्धन करण्याचे आदेश दिले होते. कांदळवन हे प्रामुख्याने वन म्हणून कसे सुरक्षित राहील, यासाठी काम करा, असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर काही प्रमाणात का होईना स्थिती बदलत गेली.अभियानातून रोजगारनिर्मिती होत आहे?कांदळवनाचा राखीव जंगल म्हणूनही विचार केला जात असताना आणि कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन सुरू असतानाच यातून स्थानिकांना रोजगार कसा मिळेल, याचा विचार सुरू झाला. नुसता विचार नाही तर प्रत्यक्षात कामही सुरू झाले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात याबाबतचे प्रयोग राबवत मत्स्यव्यवसाय सुरू झाला. स्थानिकांना यातून रोजगार मिळू लागल्यावर स्थानिकांनी कांदळवनाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला. मात्र येथे एक मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे आणि तो म्हणजे; ही एक सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे. याकडे केवळ उद्योग, रोजगार अथवा काम म्हणून पाहू नये.सोशल मीडियाचा आधार घेतला आहे?सोशल मीडियाचा आधारही आम्ही घेत आहोत. मात्र याकामी फक्त सोशल मीडियाचा वापर करून भागणार नाही तर समाजातील प्रत्येक घटकाची मदत घ्यावी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे एका दिवसात होण्यासारखे काम नाही. यासाठी खूप काळ लागणार आहे. परिणामी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे.कांदळवन कक्षाच्या कामाविषयी काय सांगाल?राज्यासह मुंबईच्या कांदळवनाच्या संवर्धनासाठीचा विभाग/कक्ष हा काही जुना नाही. तो आता स्थापन झाला आहे. वनविभागात कांदळवन कक्ष नव्हता. २०१२ साली राज्याच्या कांदळवन कक्षाची स्थापना झाली. परिणामी आता कांदळवनाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरूझाले आहे. राज्यासह मुंबईत वेगाने काम सुरू असून, यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाने पुढाकार घेतला पाहिजे.कांदळवनाचे क्षेत्र कुठे अधिक आहे?मुंबई शहर आणि उपनगराचा विचार केला तर मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरातील कांदळवनांचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: पूर्व आणि पश्चिम उपनगरात कांदळवनांचे क्षेत्र अधिक आहे. शिवडी, वांद्रे, मालाड-मालवणी, कांजूरमार्गसह समुद्रालगतच्या क्षेत्रात कांदळवने पसरली असून, खाडीलगतच्या क्षेत्रात कांदळवनाचे प्रमाण अधिक आहे. येथील कांदळवनांची स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मोहिमेला मुंबईकरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.जगात कांदळवन कुठे अधिक आहे?जागतिक स्तराचा विचार करता जगात इंडोनेशियामध्ये कांदळवनांचे क्षेत्र सर्वाधिक आहे आणि आपल्या देशाचा विचार करता सुंदरबनमध्ये कांदळवनाचे प्रमाण अधिक आहे. मलेशिया, सिंगापूर आणि सिडनीमध्ये कांदळवनांच्या संरक्षणासह संवर्धनासाठी दखल घेण्याजोगे काम केले जाते. तिकडे कांदळवनाला प्राथमिकता दिली जाते. आपणही आपल्यापरीने यासाठी काम केले पाहिजे.कांदळवनाची हानी नेमकी कशी होते?कांदळवनात कचरा जमा झाला की त्याचा श्वास गुदमरतो. कांदळवनाची हानी होते. खाडीतला कचरा वाहून समुद्रात जाताना तो कांदळवनात अडकतो. अशा वेळी त्याची मुळे झाकली जातात. मुळांवर कचरा जमा झाला की आॅक्सिजनची मात्रा कमी होते. आणि मग कांदळवनाची मुळे आपल्याला जमिनीवर आल्याचे दिसते. कांदळवनात दलदलसदृश चित्र निर्माण झाले की ही समस्या निर्माण होते. यामुळे कांदळवनाला हानी पोहोचते. म्हणजेच येथे जमा झालेला कचरा काढण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आम्ही स्वयंसेवकांची मदत घेत आहोत. यासाठी मुंबईकरांनी पुढे आले पाहिजे.अनधिकृत बांधकामावर कारवाई होते?सागरी नियंत्रण रेषा (सीआरझेड) एकमध्ये कांदळवनाला संरक्षणआहे. ही जागा कोणालाच कोणत्याच कामासाठी वापरता येत नाही. पण आपल्याकडे याबाबत थोडी शिथिलता आहे. कांदळवन खासगी जमिनीवर असो वा सरकारी जमिनीवर; त्याचे संवर्धन झाले पाहिजे. परंतु येथे अंमलबजावणी आवश्यक आहेआणि नेमकी तीच होताना दिसतनाही. वनविभागाचा विचार करता वनविभागाला कारवाईबाबत पुरेसे अधिकार नाहीत. त्यांना काहीमर्यादा पडतात. जिल्हाधिकारीकिंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासंदर्भातील कारवाई करणे अपेक्षित असते. मात्र त्यांच्याकडून काहीच केले जात नाही. कांदळवनातील अतिक्रमणावर आम्ही कायमकारवाई करत असतो. मागील काही महिन्यांत आम्ही सुमारे चार हजार अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. आम्ही वेगाने कारवाई करत असल्याने आता समाजकंटकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. परिणामी कांदळवनांचे क्षेत्र वाढत आहे आणि अतिक्रमणे कमी होत आहेत; ही वस्तुस्थिती आहे.मुंबईतील कांदळवनाच्या क्षेत्रात २०१५ च्या तुलनेत १६ चौरस किमीची वाढ झाली आहे. २०१५ साली मुंबईतील कांदळवन ४८ चौरस किलोमीटरवर पसरले होते. २०१७ साली हे क्षेत्रफळ ६४ चौरस किलोमीटर एवढे झाले.ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर कांदळवन विस्तारलेले आहे.रायगड जिल्ह्यात १०६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर कांदळवन विस्तारले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ३० चौरस किलोमीटर