मुंबई : शहरामध्ये विशेष करून कुत्रा चावण्याच्या घटना नियमितपणे घडत असतात. त्यासाठी लागणाऱ्या औषधोपचाराची सरकारी रुग्णालयात मोफत व्यवस्था केलेली असते. कुत्रा चावल्यानंतर योग्य उपचार घेतले नाही तर रेबीज होण्याची शक्यता असते. याकरिता ज्या व्यक्तीला कुत्रा चावला आहे त्याने तत्काळ उपचार घेतले पाहिजे. अन्यथा हा आजार बळावून रेबीजचे विषाणू मेंदूत जाऊन ती व्यक्ती कोमात जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. प्राणी चावल्यामुळे रेबीज हा व्हायरस शरीरात पसरतो. हा व्हायरस शरीरात गेल्यानंतर तो प्रथम मानवाच्या मज्जासंस्थेवर हल्ला करतो.
सध्या जी औषधे आपल्याकडे सरकारी रुग्णालयात आहेत ती मोफत आहेत. कुठलाही प्राणी चावल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी रुग्णालयात जाऊन यावरील उपचार घेणे गरजेचे आहे. कारण रेबीज किती दिवसाने शरीरात पसरेल हे सांगता येत नाही. मात्र, जितक्या तातडीने उपचार होणे गरजेचे आहे. आपत्कालीन विभागात ही औषधे २४ तास उपलब्ध असतात. पूर्वीसारखी मोठ्या संख्यने औषधे घेण्याची गरज पडत नाही. पाच इंजेक्शनचा कोर्स हा पुरेसा असतो. ऋजुता हाडिये, जनऔषधवैद्यक विभागप्रमुख, नायर रुग्णालय
प्रतिबंधात्मक उपाय- प्राणी चावल्यास वाहत्या पाण्यात जखम स्वच्छ धुवावी. - चावलेल्या कुत्र्याचे लसीकरण झाले आहे की नाही याची जमल्यास माहिती काढावी तत्काळ डॉक्टरकडे जावे घरगुती उपचार करू नये.
- पूर्वी कुत्रा चावल्यानंतर अनेकांना त्यावरील उपचाराची भीती अधिक वाटायची. कारण १४ इंजेक्शन पोटात घ्यावी लागत असत. - आत त्या उपचार पद्धतीत खूप मोठे आमूलाग्र बदल झाले आहेत. सध्याच्या घडीला पाहिल्या दिवशी - तिसऱ्या दिवशी- सातव्या दिवशी - चौदाव्या दिवशी - अठ्ठाविसाव्या दिवशी अशी पाच इंजेक्शन घ्यावी लागतात.
- मानसिक त्रास होणे - आवाजात बदल होणे - पाण्याची आणि प्रकाशाची भीती वाटणे - भास होणे - झटके येणे - दैनंदिन व्यवहारात बदल होणे - डोकेदुखी