Coronavirus Outbreak! सहव्याधीग्रस्तांना कोरोना संसर्गाचा धोका; काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 05:45 AM2022-12-25T05:45:36+5:302022-12-25T05:46:16+5:30

Coronavirus Outbreak: मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ज्येष्ठ नागरिक, मधुमेहग्रस्त आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

risk of corona infection to co morbid patients bmc appeal to care | Coronavirus Outbreak! सहव्याधीग्रस्तांना कोरोना संसर्गाचा धोका; काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन

Coronavirus Outbreak! सहव्याधीग्रस्तांना कोरोना संसर्गाचा धोका; काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  कोरोना विषाणूबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका सहव्याधीग्रस्तांना अधिक असून, या गटातील नागरिकांनी कोविड वर्तणुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असेही पालिकेने नमूद केले आहे. 

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ज्येष्ठ नागरिक, मधुमेहग्रस्त आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ओमायक्रॉनचा उपप्रकार असलेल्या बीएफ.७ या विषाणूचा फैलाव पटकन होत असल्याने पालिका आरोग्य विभागानेही आता रुग्ण सापडल्यास तातडीच्या उपचारांसाठी पूर्वतयारी करून ठेवली आहे.

चाचण्यांमध्ये करण्यात येत असलेल्या वाढीसह ऑक्सिजन साठ्यापासून विभागनिहाय वॉर्डरूम तयार आहेत, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. त्याचप्रमाणे  कोविडचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी पालिका लसीकरण मोहिमेची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर देत आहे. 

ही काळजी घ्या

-  सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क लावा.
- इतरांपासून सामाजिक अंतर राखा.
- साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा.
- आजारी असल्यास घरी विलगीकरणात राहा.
- लक्षणे असल्यास गर्दी टाळा.
- वृद्ध नागरिक, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी योग्य खबरदारी घ्या.
- पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण पूर्ण करावे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: risk of corona infection to co morbid patients bmc appeal to care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.