निवर चक्रीवादळामुळे पुन्हा पावसाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:17 AM2020-11-26T04:17:01+5:302020-11-26T04:17:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार हाेत असलेल्या निवर या चक्रीवादळामुळे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ...
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार हाेत असलेल्या निवर या चक्रीवादळामुळे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात ढगाळ वातावरण, पाऊस व धुके वाढणार आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली.
गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, जालना, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, अकोला, परभणी आदी जिल्ह्यांतील काही भागात येत्या आठवड्यात पाऊस तसेच काही ठिकाणी पावसाबरोबर गारा पडतील. तर नंदूरबार, धुळे, जळगाव व नाशिकच्या काही भागात पाऊस पडेल.