स्वाइनचा धोका वाढला

By admin | Published: June 29, 2017 02:55 AM2017-06-29T02:55:00+5:302017-06-29T02:55:00+5:30

पावसाळा सुरू होण्याआधीच स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे आढळले आहे. शहरात मंगळवारपर्यंत स्वाइन फ्लूचे

The risk of swine is increased | स्वाइनचा धोका वाढला

स्वाइनचा धोका वाढला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पावसाळा सुरू होण्याआधीच स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे आढळले आहे. शहरात मंगळवारपर्यंत स्वाइन फ्लूचे १३५ रुग्ण आढळले असून त्यात ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचारांसाठी भरती होणाऱ्या रुग्णांना काही हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात इतर रुग्णांबरोबर एकत्र ठेवल्यानेच स्वाइनचा धोका वाढल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फ्लूच्या रुग्णांसाठी वेगळा कक्ष निर्माण करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेने शहरातील खाजगी रुग्णालयांना केल्या आहेत. सर्व रुग्णालयांची गुरूवारी पाहणी होणार असून त्यासाठी दिल्लीचे पथक ठाण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
पुणे, मुंबईनंतर आता ठाण्यात स्वाइन फ्लूच्या रु ग्णांमध्ये वाढ होत असल्याने याची गंभीर दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी आणि कोणत्या प्रकारची खबरदारी शहरातील हॉस्पिटल्सने घ्यायच्या आहेत, यासंदर्भात बुधवारी एका कार्यशाळेचे आयोजन ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात केले होते. या कार्यशाळेमध्ये शहरातील सर्व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांत पुणे आणि मुंबईसारखी शहरे बाधित होती. मात्र, आता ठाण्यातही स्वाइनच्या रु ग्णांमध्ये वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब मानली जात आहे. यासाठी ठाणे महापालिकेने अ‍ॅक्शन प्लान तयार केला असून या रोगाला कशा प्रकारे प्रतिबंध करायचा, यासाठी ठाण्यातील डॉक्टरांना महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. स्वाइनच्या रु ग्णांसाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये काय उपाय करण्यात येत आहेत,याची विचारणा केल्यानंतर सर्व रु ग्णांना एकत्र एसी रूममध्ये ठेवण्यात येत असल्याची गंभीर बाब उघड झाली. त्यामुळे आता अशा सर्व रु ग्णांची पाहणी करण्यात येणार असून स्वाइनच्या रु ग्णांसाठी वेगळा कक्ष स्थापन करण्याच्या महत्त्वाच्या सूचना डॉ. केंद्रे यांनी यावेळी केल्या.
ज्येष्ठ नागरिक मुलांची घ्या काळजी -
गरोदर स्त्रिया, ६० वर्षांवरील वृद्ध आणि ५ वर्षांखालील मुलांना स्वाइन फ्लू होण्याची जास्त शक्यता असून या वर्गाने जास्त काळजी घेण्याचे आवाहन या कार्यशाळेत करण्यात आले.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनीदेखील स्वाइन फ्लूचे रु ग्ण वाढल्याने चिंता व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयामध्ये ५ बेडची वेगळी सुविधा केली असल्याची माहिती दिली. संपूर्ण टीम या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार ठेवल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Web Title: The risk of swine is increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.