Join us

पावसाळ््यात दरडींचा धोका कायम

By admin | Published: June 11, 2015 6:01 AM

मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी पावसाची छोटीशी सरही सुखद ठरत आहे़ त्याचवेळी भांडुप, कांजूरमार्ग, भायखळा, कुर्ला,

मुंबई : मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी पावसाची छोटीशी सरही सुखद ठरत आहे़ त्याचवेळी भांडुप, कांजूरमार्ग, भायखळा, कुर्ला, घाटकोपर या विभागांतील रहिवाशांचा मात्र काळजाचा ठोका चुकत आहे़ पाणी तुंबणे, दरड कोसळणे आणि मोडकळीस आलेल्या इमारती असा धोका या विभागांवर घोंघावत आहे़ मान्सूनपूर्व आढाव्यात हे विभाग धोकादायक असल्याचे उजेडात आले आहे़पावसाळापूर्व तयारीसाठी महापालिकेमार्फत मुंबईतील सर्व विभागांचे सर्वेक्षण करुन धोकादायक ठिकाणे शोधण्यात येतात़ जेणेकरुन मान्सूनच्या कालावधीत चार महिने या वॉर्डांवर नजर ठेवणे, आवश्यकतेनुसार सावधगिरीच्या उपाययोजना आखणे व मनुष्यबळ, साधनसामुग्री तैनात ठेवणे सोपे ठरते़ या सर्वेक्षणानुसार यावर्षी पाणी तुंबण्याची २४० ठिकाणे, २८५ जागांवर दरड कोसळण्याचा धोका तसेच ६७५ इमारती अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे़त्यानुसार भांडुप आणि कांजूरमार्ग या विभागांमध्ये सर्वाधिक १६१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका संभावतो़ तर अंधेरी पश्चिम या भागात सर्वाधिक १९ पाणी तुंबण्याची ठिकाणे आहेत़ धोकादायक इमारतींची संख्या सर्वाधिक ११२ कुर्ला आणि घाटकोपरमध्ये ७६ इमारती आहेत़ पावसाळ्यातील चार महिने या ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभाग कार्यालयामार्फत सावधगिरीच्या उपाययोजना आखण्यात येणार आहेत़ (प्रतिनिधी)