धोका अनधिकृत बांधकामांचा!
By admin | Published: August 21, 2014 11:25 PM2014-08-21T23:25:14+5:302014-08-21T23:25:14+5:30
कळवा, मुंब्रा विधानसभा क्षेत्र हा दाटवाटीने वसलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यात वीज, पाणी आणि प्रदूषणाची समस्या आहेच.
Next
अजित मांडके - ठाणो
कळवा, मुंब्रा विधानसभा क्षेत्र हा दाटवाटीने वसलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यात वीज, पाणी आणि प्रदूषणाची समस्या आहेच. परंतु येथील हजारो कुटुंबे ही आजही एका भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. आपण ज्या इमारतीत राहत आहोत, ती कधी कोसळेल याची खात्री येथील एकाही रहिवाशाला नसल्याने ते आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत. या भागात अनधिकृत बांधकामांच्या समस्या अधिक असून, मागील काही वर्षात झालेल्या इमारत दुर्घटनांमध्ये 128 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु आजही येथील ही समस्या सुटू शकलेली नाही़
ठाणो शहरात असूनही या मतदारसंघात आजही वीजकपातीचे संकट आहे. चोरीची वीज वापरणो, तसेच वीजगळतीच्या समस्येमुळे या भागात चार ते पाच तासांचे भारनियमन सुरू आहे. तसेच पाणीगळतीचे प्रमाण अधिक असल्याने टंचाईच्या समस्येलाही येथील रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यातही पाणी, मालमत्ता आणि वीज बिलांची थकबाकी वसूल करण्यात पालिका अथवा महावितरणला येथे पाहिजे तसे यश आलेले नाही. पाण्याची आणि मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी पालिकेने अनेक उपाय योजले आहेत. परंतु या भागातून त्यांना 4क् टक्क्यांच्या आसपासाच वसुली करता आलेली आहे. त्यामुळे येथे सुविधा देतानाही पालिका हात आखडता ठेवत आहे.
दरम्यान, या समस्या असताना येथे वाढलेली अनधिकृत बांधकामे ही प्रमुख समस्या या मतदारसंघाला भेडसावत आहे. 1995 ते 2क्13 या कालावधीत या ठिकाणी झालेल्या विविध इमारत दुर्घटनांत 128 जणांचे प्राण गेले तर 88 जण जखमी झाले. या दुर्घटनांमुळे अनेक संसार मातीमोल झाले आहेत. परंतु, त्यावर अद्यापही पालिकेला अथवा स्थानिक आमदाराला तोडगा काढता आलेला नाही. 1995मध्ये झालेल्या रशिद कम्पाउंड दुर्घटनेत 24 जण दगावले तर 13 जण जखमी झाले होते. त्यानंतर 2क्1क्मध्ये कळव्यातील शब्बे अपार्टमेंट इमारत कोसळली होती. परंतु यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. त्यानंतर याच वर्षात सोनाबाई इमारत दुर्घटनेत 1क् जण दगावले तर 5 जखमी झाले. त्यानंतर मुंब्य्रात झालेल्या दुर्घटनेत 6 जण दगावले तर 4 जखमी झाले. मागील वर्षी एप्रिल 2क्13मध्ये मुंब्य्रातील लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेत 74 जणांना आपले प्राण गमावावे लागले तर 56 जण या घटनेत जखमी झाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर पालिका प्रशासनाबरोबरच झोपी गेलेले स्थानिक नगरसेवक आणि आमदारांनाही जाग आली. त्यांनी येथील इमारतींना संरक्षण मिळावे म्हणून क्लस्टरची योजना तत्काळ येथे राबविली जावी यासाठी उपोषण, आंदोलन केले. अखेर एका वर्षाने राज्य शासनाने या योजनेला मंजुरी दिली खरी परंतु अद्यापही याची अंमलबजावणी झालेली नाही.
लकी कम्पाउंड इमारत दुर्घटना ताजी असतानाच मुंब्य्रात पुन्हा स्मृती इमारत दुर्घटनेत 1क् जणांचा मृत्यू झाला तर 1क् जण गंभीर जखमी झाले होते. तसेच बानो इमारत दुर्घटनेत 4 जण दगावले होते. परंतु, आजही महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही.
स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्लस्टरचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. कळव्यात 71 इमारती या आजच्या घडीला धोकादायक तर 8 इमारती या अतिधोकादायक स्थितीत आहेत. मुंब्य्रात 133 इमारती या धोकादायक असून, 12 इमारती या अतिधोकादायक अवस्थेत आहेत. या इमारतींमध्ये हजारो कुटुंबे भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत.
लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने येथील बांधकामांवर आळा बसावा यासाठी एका विशेष पथकाची निर्मिती केली होती. त्याच्या सोबत प्रभाग समितीचे पथकही काम पाहणार होते, त्यानुसार सुरुवातीला कारवाईचा आलेख चांगलाच वाढलेला दिसून आला. परंतु 3-4 महिन्यांनी कारवाईचा हा सपाटा थंडावला आणि हे पथक इतिहासजमा झाले. सद्य:स्थितीत अतिशय थंडपणो या भागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. अनधिकृत बांधकामे वाढण्यामागे पालिका प्रशासनाबरोबर राजकीय मंडळीसुद्धा जबाबदार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. असे असूनही येथे आजही अनधिकृत बांधकामे नव्याने होताना दिसत आहेत.
च्दाटीवाटीने येथे वस्ती वसली असल्याने सांडपाण्याच्या निच:याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. गलिच्छ वस्त्या, स्वच्छतेचा अभाव, आणि गुन्हेगारी पाश्र्वभूमी यामुळे हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. तसेच कळव्यातील पारसिक डोंगरावर वसलेली वस्ती हीसुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून भीतीच्या सावटाखाली वावरत असून, माळीनसारखी दुर्घटना घडली तर येथील शेकडो कुटुंबे बेघर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
च्ठाणो महापालिकेत जरी हा मतदारसंघ येत असला तरी शहराला मिळणा:या विविध सुखसोईंपासून हा मतदारसंघ आजही वंचित राहिलेला आहे. प्रत्येकवेळी येथील रहिवाशांना राजकारण्यांकडून विविध स्वरूपाची आश्वासने दिली जातात. परंतु त्याची पूर्तता मात्र होताना दिसत नाही.
च्महापालिकेमार्फत येथे 1क्क् खाटांचे रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु ते आजही कागदावरच असून येथील रहिवाशांना शासकीय रुग्णालयात उपचार घ्यायचे झाले तरी त्यांना कळवा रुग्णालय अथवा जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घ्यावी लागते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाही येथे बोजवारा उडाला असून, रहिवाशांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राजकीय मंडळीदेखील अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.