'रिव्हर मार्च' : अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर थिरकले मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 04:37 PM2018-02-27T16:37:57+5:302018-02-27T16:38:25+5:30
मुंबईतील दहिसर, पोयसर आणि मिठी नदीची दैनावस्था झाली असून या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सुरु असलेल्या 'रिव्हर मार्च' या चळवळीतर्फे सातत्याने जनजागृती केली जात आहे. या चळवळीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची साथ मिळाली आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईतील दहिसर, पोयसर आणि मिठी नदीची दैनावस्था झाली असून या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सुरु असलेल्या 'रिव्हर मार्च' या चळवळीतर्फे सातत्याने जनजागृती केली जात आहे. या चळवळीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची साथ मिळाली आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थिरकले असून त्यांनी या अँथम मधून नद्यांचे महत्व विषद केले आहे.
बीकेसी येथील सोफिटल या पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकतेच या गाण्याचा प्रकाशन सोहळा अमृता फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यांच्या हस्ते या गाण्याचे शानदार लॉन्चिंग झाले. या अँथमचे शूटिंग दहिसर नदीच्या परिसरात झाले आणि विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी याच्या रेकॉर्डिंगसाठी सलग तीन दिवसातील आपला मोलाचा वेळ दिला आहे.
मुंबईच्या नद्यांना पुनरुज्जीवन देण्यासाठी गेल्या ४ वर्षांपासून ' रिव्हर मार्च ' ही चळवळ सुरु आहे. ' रिव्हर मार्च ' च्या अँथमच्या माध्यमातून मुंबईकरांना एकटवण्यासाठी आता अमृता फडणवीस यांनी गाण्यातून आर्द साद घातली आहे. 4 मार्च रोजी दहिसर नदी परिक्रमेत मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी रिव्हर मार्च, लीला एन्टरटेन्टमेंटचे सचिन गुप्ता, विक्रम चोगले आणि टी सिरीजच्या माध्यमातून मुंबई रिव्हर अॅंथम तयार करण्यात आले आहे.
अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी या गाण्याला आपला आवाज दिला असून अमृता फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पाालिका आयुुक्त अजोय मेहता, पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी गाण्यात सहभाग घेत मुंबईतील नद्या वाचवण्यासाठी मुंबईकरांना साद घातली आहे. यासह मुंबईचे डबेवाले, कोळीबांधवही या गाण्यात मुंबईच्या नद्यांना पुनरुज्जीवन देण्यासाठी सहभागी झाले आहेत.
गाण्याच्या प्रकाशनाप्रसंगी अमृता फडणवीस यांनी मुंबईच्या नद्यांचे महत्त्व विषद केले आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या की, " नद्यांना आपण पूज्य मानतो. भारतीय संस्कृतीत नद्यांना आईचे स्थान देण्यात आले आहे. मी विक्रम चोगले यांच्यासह मिठी, पोयसर, ओशिवरा आणि दहिसर नदीची पाहणी केली. या नदींची दूरावस्था मन विषण्ण करणारी होती. म्हणूनच रिव्हर मार्चशी नाते जोडत नद्या वाचवण्याचा निर्णय मी घेतला. या गाण्याच्या माध्यमातून मुंबईच्या नद्या वाचवण्याचा संदेश उत्तम पद्धतीने पोहोचेल," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा संदेश देण्यासाठी गाणं हे चांगले माध्यम आहे त्यामुळेच हिंदीसोबतच मराठीमध्येही हे गाणे तयार करण्यात आले आहे. ४ मार्चच्या या रिव्हर मार्चमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, रिव्हर मार्चचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मुंबईकर मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.