Join us

मुंबईत यंदा नद्या, नाले तुंबणार नाहीत; गाळ उपसण्यासाठी पालिका करणार १२५ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 6:20 AM

या कामासाठी पालिका १२५ कोटी रुपये खर्च करणार आहे. 

मुंबई : वेळेत गाळ उपसला जात नसल्याने मुंबईतील नाले दरवर्षी पावसाळ्यात तुंबतात. यंदा असे होऊ नये यासाठी पालिकेने नाल्यांसह मुंबईतील नद्यांमधील गाळ वेळेत उपसण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी पालिका १२५ कोटी रुपये खर्च करणार आहे. 

दरवर्षी पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. मात्र नालेसफाई वेळेत सुरुवात होत नसल्याने १०० टक्के सफाई होत नाही परिणामी भरतीच्या वेळेस पाण्याचा निचरा होत नाही व मुंबई तुंबते. महापालिकेचा कारभार प्रशासकाकडून सुरू असून आगामी पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून पालिकेने वेळेतच नाल्यातील गाळ उपसण्याचे नियोजन आहे. मिठी नदी, पोयसर आणि दहिसर या नद्यांचाही यात समावेश आहे. 

सीसीटीव्ही बसवणारकंत्राटदाराकडून नालेसफाई योग्य पद्धतीने होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी पालिकेने सीसीटीव्ही लावले होते, यंदा देखील या कामांवर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

 नाल्यांसाठी ६, मिठीसाठी ३ निविदापालिकेने ६ निविदा काढल्या असून त्यात मोठ्या नाल्यांचा समावेश आहे. १ मुंबई शहर आणि ४ उपनगर यांचा समावेश आहे. या निविदा जानेवारीच्या शेवटी काढण्यात येणार आहेत. तर  ३ निविदा मिठी नदीसाठी काढल्या जाणार आहेत.

लहान नाल्यांतील गाळ उपसण्यासाठी निविदा काढल्या आहेत. मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील. गेल्या वर्षी गाळ काढण्याला एप्रिल महिन्यात सुरुवात करण्यात आली होती, यंदा मार्च महिन्यातच सुरुवात केली जाणार आहे.- विभास आचरेकर, मुख्य अभियंता

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाणीपाऊस