आरजे मलिष्कावर भरधाव गाडी चालवल्याचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:24 AM2020-12-15T04:24:01+5:302020-12-15T04:24:01+5:30
सांताक्रुझमधील प्रकार : धडकेत एका कारचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भरधाव आणि निष्काळजीपणे गाडी चालवत अन्य कारला ...
सांताक्रुझमधील प्रकार : धडकेत एका कारचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भरधाव आणि निष्काळजीपणे गाडी चालवत अन्य कारला धडक देत तिचे नुकसान केल्याप्रकरणी आरजे मलिष्का मेंडोसावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सांताक्रुझ पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
सांताक्रुझ पश्चिमच्या शिवाजीनगर परिसरातील राजेश खन्ना गार्डनजवळ हा प्रकार घडला. मलिष्का स्वतः तिची बीएमडब्ल्यू कार चालवत मैत्रिणीच्या घरी निघाली होती. त्या वेळेस भरधाव वेगातील गाडीवरील तिचे नियंत्रण सुटले आणि ती जाऊन अन्य एका कारला धडकली. अविनाश (४५) नामक व्यक्तीची ती कार हाेती. त्या कारचे नुकसान झाल्याप्रकरणी त्याने सांताक्रुझ पोलिसात तक्रार दाखल केली. कार चालवताना संशयित नशेत होती का, याबाबतच्या अहवालाची प्रतीक्षा पोलीस करत आहेत.
..........................