Join us

मालाड रेल्वे स्थानकावरील जिना बंद, रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 5:18 AM

मालाड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवरील जिन्याच्या पायऱ्यांचे दुरुस्ती काम सुरू असल्याने हा जिना बंद करण्यात आला आहे.

मुंबई : मालाड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवरील जिन्याच्या पायऱ्यांचे दुरुस्ती काम सुरू असल्याने हा जिना बंद करण्यात आला आहे. स्थानकातील हा पूल महत्त्वाचा असल्याने सर्वाधिक प्रवासी या पुलाचा वापर करतात. मात्र रक्षाबंधनाच्या काही तासांआधी पायºया बंद झाल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

मालाड पूर्वेकडील त्रिवेणीनगर, शिवाजीनगर, संतोषीनगर, कोकणीपाडा, आनंदवाडी नाका आणि आप्पापाडा तसेच पश्चिमेकडीलही सर्व नागरिक या पुलाचा वापर करतात. रविवारी रक्षाबंधन सणानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले होते. प्रवाशांना प्रवासादरम्यान पुलाच्या उजव्या बाजूकडील सुरू असलेल्या पायºयांचा वापर करताना धक्काबुक्कीचा सामना करावा लागत होता. रेल्वे प्रशासनाने या वेळी गर्दीचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बळ (एमएसएफ) कर्मचाºयांची नेमणूक केली होती. मात्र, पुलावर अवघ्या एका कर्मचाºयावर गर्दी नियंत्रणाची जबाबदारी असल्याने गर्दी आवरताना नाकीनऊ आले होते. दरम्यान, रेल्वेचा पूल जुना असल्याने पर्यायी दुसºया नवीन पुलाची उभारणी सुरू आहे. त्यामुळे पुलाचा एक मार्ग बंद करण्यात आला आहे. गर्दीच्या नियोजनावर रेल्वेचे पूर्णपणे लक्ष आहे, अशी माहिती स्थानकातील रेल्वे अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 

टॅग्स :मुंबई