दाना बंदरचा रस्ता अखेर वाहतुकीसाठी मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 02:09 AM2020-01-09T02:09:57+5:302020-01-09T02:10:02+5:30
दाना बंदर परिसरातील ठाणे स्ट्रीट व कल्याण स्ट्रीट यांना जोडणाऱ्या ६० फुटी रस्त्यावर गेली १४ वर्षे अतिक्रमण होते.
मुंबई : दाना बंदर परिसरातील ठाणे स्ट्रीट व कल्याण स्ट्रीट यांना जोडणाऱ्या ६० फुटी रस्त्यावर गेली १४ वर्षे अतिक्रमण होते. गोदामांसारखा वापर होत असलेल्या या अनधिकृत बांधकामांमुळे हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने महापालिकेच्या कारवाईवर स्थगिती आली होती. न्यायालयाने ही स्थगिती उठविल्यानंतर बी विभाग कार्यालयाने पोलीस संरक्षणात सुमारे १५ हजार चौरस फुटांच्या जागेवर असलेली अतिक्रमणे हटविली. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीला खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दाना बंदर परिसरात भारतातील विविध शहरांच्या नावांचे रस्ते आहेत. यापैकी ठाणे व कल्याण या शहरांच्या नावांनी ओळखल्या जाणाºया दोन रस्त्यांना जोडणारा एक ६० फुटी रस्ता आहे. सन १९५७च्या शहर नियोजनानुसार ६० फुटी रुंदीच्या व २५० फूट लांबीच्या रस्त्यावर सन २००५-०६ या काळात काही कच्च्या स्वरूपातील अनधिकृत बांधकामे उभी राहिली. या बांधकामांचा वापर गोदामांसारखा होत असलेल्या या अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ठ होऊन पालिकेच्या कारवाईवर स्थगिती आली होती. ही स्थगिती न्यायालयाद्वारे उठविल्यानंतर बी विभाग कार्यालयाने अनधिकृत बांधकामे तोडली.
या कारवाईसाठी ३० पोलीस कर्मचारी, पालिकेचे १२० कामगार, कर्मचारी-अधिकारी तैनात होते. या कारवाईदरम्यान दोन जेसीबी, दोन डंपर, एक ट्रक यांसह इतर आवश्यक यंत्रसामग्री व वाहनेदेखील वापरण्यात आली. बी विभागातील सहायक अभियंता विशाल म्हैसकर व कनिष्ठ अभियंता सचिन खरात यांच्या देखरेखीखाली ही कारवाई झाली. ठाणे स्ट्रीट व कल्याण स्ट्रीटला जोडणारा रस्ता मोकळा झाल्याने येथील वाहतुकीचा मार्ग सुकर होणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त नितीन आर्ते यांनी दिली.
>गेल्या दहा ते बारा वर्षांतील बांधकामे
सन १९५७च्या शहर नियोजनानुसार ६० फुटी रुंदीच्या व २५० फूट लांबीच्या रस्त्यावर सन २००५-०६ या काळात काही कच्च्या स्वरूपातील अनधिकृत बांधकामे उभी राहिली. गोदामांसारखा होत असलेल्या या अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता बंद होता़