रस्ता उधाणाच्या पाण्याखाली

By admin | Published: March 23, 2015 10:41 PM2015-03-23T22:41:25+5:302015-03-23T22:41:25+5:30

दोन दिवसांपासून समुद्राच्या उधाणाच्या पाण्याने अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील शिरवली-माणकुळे रस्ताच पाण्याखाली गेला आहे,

Road drainage under water | रस्ता उधाणाच्या पाण्याखाली

रस्ता उधाणाच्या पाण्याखाली

Next

जयंत धुळप ल्ल अलिबाग
दोन दिवसांपासून समुद्राच्या उधाणाच्या पाण्याने अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील शिरवली-माणकुळे रस्ताच पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. खारेपाट विभागातील खाडी किनारपट्टीतील भरती संरक्षक बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती शासनाच्या खारलॅन्ड विभागाकडून होते, मात्र गेल्या २० ते २२ वर्षांत करण्यात आलेली नाही. त्यामुळे बहिरीचापाडा, माणकुळे, नारंगीचा टेप व शिरवली या गावांना समुद्री उधाणाचा फटका सातत्याने भोगावा लागत आहे. खारलॅन्ड विभागाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे बहिरीचापाडा गावातील उधाणग्रस्त शेतकरी चंद्रकांत वासुदेव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
याच परिसरातील १४ शेतकऱ्यांच्या भातशेती जमिनीत, बांधबंदिस्ती फुटल्याने समुद्राचे खारे पाणी शेतात घुसून त्या नापीक झाल्याने उदरनिर्वाहाचे साधनच गेले असल्याने आता पुढे करायचे काय असा प्रश्नच येथील नागरिकांना सतावू लागला आहे.
या सर्व शेतकऱ्यांनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागून या समस्येचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतरही कोणतीही कार्यवाही शासनाकडून करण्यात आली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

खार बांधबंदिस्तीचे आदेश
४रस्त्यावर उधाणाचे पाणी आल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता संबंधित यंत्रणेला, तर खार बांधबंदिस्तीकरिता खारलॅन्ड विभागास आदेश देण्यात येत असल्याची माहिती अलिबागचे तहसीलदार विनोद खिरोडकर यांनी या परिसराची पाहणी केल्यावर बोलताना दिली आहे.

अधिकारी पर्यटनार्थ लोणावळ्यात
४शिरवली-माणकुळे रस्ता उधाणाच्या पाण्याखाली गेल्यावर यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या हेतूने चंद्रकांत पाटील यांनी खारलॅन्ड विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता, ‘आम्ही पुणे-लोणावळा येथे फिरायला आलो, आल्यावर पाहतो’ असे उत्तर मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Road drainage under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.