वाडा : तालुक्यातील प्रचंड वर्दळीचा रस्ता असलेल्या व मोठया प्रमाणात उद्योगधंदे असलेल्या कुडूस-कोढला या रस्त्यावर पाउस सुरू झाल्यापासून अनेक अपघात झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून याचा नाहक त्रास विद्यार्थी, नगारिक व उद्योजकांना होत आहे. केवळ ठेकदार व संबधीत अधिकऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे शासनाचा करोडो रूपयांचा निधी पाण्यात गेला असून या परिसरातील नागािकची प्रचंड गैरसोय झाल्याने संबधीतांवर कारर्वा करण्याची मगणी पंचायत समितीच्या माजी सदस्या अंकिता दुबेले यांन केली आहे.कडूस-कोढला हा १० कि. मी. चा रस्ता असून या रस्त्यासाठी शासनाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत ४ कोटी ८३ लाख इतका निधी मंजूर केला होता या रस्त्याचा ठेका गजानन कंट्रक्शन यांना देण्यात आल होता. या ठेकेदाराने आॅक्टोंबर नंतर या रस्त्याच्या कामाला सुरवात केली. तेंव्हा पासून ते पावसाळा सुरू झाला तरी रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने या श्रत्यावरील माती भरामुळे चिखाचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे वाहन चालकांना तरेवरची कसरत करून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान या रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असलेल्या बंबधीत अधिकारी व ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अंकिता दुबेले यांनी केली आहे. (वार्ताहर)
कुडूस-कोंढला रस्ता मृत्यूचा सापळा
By admin | Published: June 25, 2015 11:17 PM