एलईडीने उजळणार मुंबईतील रस्ते

By Admin | Published: August 8, 2016 05:33 AM2016-08-08T05:33:44+5:302016-08-08T05:33:44+5:30

वीज वाचवण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील सर्व ४० हजार ८६७ वीज खांबांवर एलईडी दिवे बसवण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली

Road to Mumbai will illuminate the LED | एलईडीने उजळणार मुंबईतील रस्ते

एलईडीने उजळणार मुंबईतील रस्ते

googlenewsNext

मुंबई : वीज वाचवण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील सर्व ४० हजार ८६७ वीज खांबांवर एलईडी दिवे बसवण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली. २०१६-१७ या वर्षात १० टक्के म्हणजेच ४ हजार ४०० एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. गिरगाव चौपाटीवर मोटरचलित लँटर्न असलेले २० मीटर उंचीचे टॉवर उभारण्यात येणार आहेत. या टॉवरवरही २७० वॅटचे आणि ४७० वॅटचे एलईडी दिवे बसवण्याचे प्रस्तावित असून, त्याचा फायदा गणेशविसर्जनाच्या वेळी होईल, असा विश्वास बेस्ट प्रशासनाने व्यक्त केला आहे.
बेस्ट प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वीजक्षेत्रात सुधारणा व्हावी म्हणून वडाळा ट्रक टर्मिनस, प्रतीक्षा नगर, बॅकबे, सिम्प्लेक्स मिल, अपोलो मिल येथे अधिक ऊर्जा क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा प्रस्ताव आहे. केईएम, महालक्ष्मी, नेव्हल डॉक, शिवडी आणि भायखळा येथील ट्रान्सफॉर्मर बदलण्याचाही प्रस्ताव आहे. नेव्हल डॉक, लव्हग्रोव्ह आणि अपोलो येथील विद्यमान कालबाह्य झालेले सर्किट ब्रेकर्स बदलण्याचा प्रस्ताव आहे.
बॅकबे, नरिमन पॉइंट, खेतवाडी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील उपकेंद्रातील केबलच्या संरक्षणासाठी फ्लडिंग स्वयंचलित कंडेन्स्ड एसेसोल अग्निशमन
यंत्रणेची खरेदी करण्यात येणार
आहे. याचा फायदा विद्युत तारांवरील आग विझविण्यासाठी होणार
आहे. 
वीजबचतीसाठी प्रकल्प
बेस्टतर्फे वीजबचतीसाठी जुन्या २५ हजार ट्युब लाइट व ५ हजार पंख्यांच्या जागी नवीन ऊर्जाबचत करणाऱ्या ट्युब लाइट आणि पंखे बसविण्यासाठी सवलत देण्याबाबतचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याची प्रक्रिया सुरूझाली आहे. आत्तापर्यंत
१८ हजार ३५७ ट्युब लाइट आणि ४ हजार ७८६ पंखे बदलण्यात आले आहेत.
४ लाख ४४ हजार
युनिट विजेची बचत
एलईडी दिव्यांचा वापर वाढावा, म्हणून बेस्टकडून निवासी ग्राहकांना आत्तापर्यंत
५२ हजार ५०० एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे ४ लाख ४४ हजार युनिट विजेची बचत झाल्याचा
दावा बेस्टने केला आहे.

Web Title: Road to Mumbai will illuminate the LED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.