तलासरी : तलासरी नाक्यावर बाजारपेठ, उधवा, संजान रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम प्रशासने राबविली. यामुळे रस्ते मोकळे झाले असून आता काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे.शनिवारी सकाळी तहसीलदार गणेश सांगळे, ग्रामसेवक गणपत गवत, ग्रापंचायत सदस्य, तलाठ्यांनी बाजारपेठेत फिरून फेरीवाले, दुकानदारांनी रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. तलासरी नाक्यावर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. माागील अनेक वर्षांपासून नाक्यावर असलेली सार्वजनिक विहिर दिसेनाशी झाली होती. या कारवाईत तीला मोकळी करण्यात आली. ग्रामपंचायतीने पुन्हा तिचे बांधकाम करावे, पावसाळ्यापूर्वी नाले, गटारे साफ करावे, नाक्यावर बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या रिक्षांना ठराविक जागेतच उभ्या करण्याच्या आमदार पास्कल धनारे व तहसीलदारांनी दिल्या. कारवाईच्यावेळी पोलीस महसूल, कर्मचारी व ग्रामपचांयत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
तलासरीचे रस्ते झाले मोकळे
By admin | Published: May 02, 2015 10:57 PM