Road Rage: कारला ओव्हरटेक केल्याचा राग, चालकाला तीन ते चार जणांकडून बॅटने जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 03:05 PM2021-07-26T15:05:20+5:302021-07-26T15:36:41+5:30

Road Rage Video: मारहाण झालेल्या चालकाची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

Road Rage: three to four men assaulted driver on highway | Road Rage: कारला ओव्हरटेक केल्याचा राग, चालकाला तीन ते चार जणांकडून बॅटने जबर मारहाण

Road Rage: कारला ओव्हरटेक केल्याचा राग, चालकाला तीन ते चार जणांकडून बॅटने जबर मारहाण

Next

मुंबई: कारला ओव्हरटेक केल्यामुळे तीन ते चार जणांनी बॅटने गाडीची काच फोडत चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईअहमदाबाद  महामार्गावर घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडिओत काही तरुणांनी फिल्मी स्टाईलने भाईगिरी करत एका कारच्या काचा फोडून कारचालकाला बेसबॉल बॅटने मारहाण केल्याचं दिसत आहे.

मुंबई-अहमदाबादमहामार्गावरील वसईच्या सतीवली खिंड येथे 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठाणे येथील व्यावसायिक हर्ष पांचाळ आपल्या स्कॉर्पिओ कारने काही कामानिमित्त वसईत आले होते. वसईतून पुन्हा आपल्या घराकडे परत जात असताना महामार्गावरील सातीवली खिंडीत हर्ष यांनी एका गाडीला ओव्हरटेक केल्यामुळे (MH 43 BU 0068) या अर्टिगा गाडीतून आलेल्या तीन ते चार अज्ञात तरुणांनी हर्ष पांचाळ यांच्या कारचा पाठलाग केला. त्यानंतर कार आडवी लावून आधी हर्षद पांचाळ यांना शिवीगाळ केली. धक्कादायक म्हणजे एकाने उतरुन बेसबॉल बॅटने पांचाळ यांच्या स्कार्पिओ गाडीची समोरील बाजूची काच फोडली. त्यानंतर लाथा बुक्क्याने मारहाण करुन आरोपी फरार झाले. 

हायवेवरील या फिल्मी स्टाईल भाईगिरीचा प्रकार हर्ष यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. दरम्यान, तरुणांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हर्ष यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. तसेच, ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करुन मुख्यमंत्री कार्यालय, पंतप्रधान कार्यालय, महाराष्ट्र डीजीपी, पालघर पोलीस, नवी मुंबई पोलीस, सदानंद दाते, नरेश म्हस्के यांच्याकडे मदत मागितली आहे. त्यांनी शस्त्राने माझ्यावर हल्ला केला आणि जीव घेण्याइतपत मारहाण केली, असा आरोप पांचाळ यांनी केला आहे.
 

Web Title: Road Rage: three to four men assaulted driver on highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.