मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे रस्ता दुरुस्ती
By admin | Published: July 31, 2014 12:23 AM2014-07-31T00:23:49+5:302014-07-31T00:23:49+5:30
पालघर जिल्ह्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री १ आॅगस्ट रोजी पालघरमध्ये येत असून त्यानिमित्ताने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
पालघर : पालघर जिल्ह्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री १ आॅगस्ट रोजी पालघरमध्ये येत असून त्यानिमित्ताने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
पालघरमध्ये १ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांसह अनेक मान्यवर येणार आहेत. मुंबई-अहमदाबाद मार्गावरुन येण्याची शक्यता पाहता मनोर-पालघर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे. प्रथम काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, नंतर अध्यक्षा सोनिया गांधी, नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यानंतर आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येत असल्याने पालघरमधील रस्ते, गटारे इ. सोयीसुविधेवर मोठा खर्च केला जात आहे. तर पालघर-बोईसर रस्त्यावरील खड्डे बुजविणे, दुतर्फा भराव इ. कामेही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.