Join us

जलवाहिनी फुटण्यास रस्ते विभाग जबाबदार?

By admin | Published: December 13, 2014 1:15 AM

रस्ते दुरुस्तीसाठी खोदकाम करताना जल अभियंता खात्याशी समन्वय साधून भूमिगत जाळ्यांची माहिती आधी घ्यावी, असे स्पष्ट आदेश आहेत़

मुंबई : रस्ते दुरुस्तीसाठी खोदकाम करताना जल अभियंता खात्याशी समन्वय साधून भूमिगत जाळ्यांची माहिती आधी घ्यावी, असे स्पष्ट आदेश आहेत़ या नियमांचे पालन न करता खोदकाम केल्यामुळेच भुलाभाई देसाई मार्गाखालून जाणा:या जलवाहिनीला तडे गेल्याचे उजेडात आले आह़े मात्र या प्रकरणी केवळ संबंधित ठेकेदारालाच कारवाईचा बडगा दाखविण्यात येणार आह़े
उपयोगिता सेवांचे खोदकाम व रस्ते दुरुस्तीमुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण सर्वाधिक आह़े या असमन्वयाचा फटका नाहक नागरिकांना बसत असल्याने पालिकेने दीड महिन्यापूर्वी बैठक घेऊन नियमावली आखली होती़ त्यानुसार रस्त्याचे काम हाती घेण्याआधी जल अभियंता खाते व रस्ते अधिका:यांनी संयुक्त पाहणी घ्यावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले होत़े पाहणीनंतर त्या रस्त्याखालून जाणा:या जलवाहिन्यांची माहिती घेऊन काम सुरू करण्याची ताकीद होती़ मात्र या सूचनांचे पालन रस्ते विभागातून होत नसल्याची नाराजी एका अधिका:याने व्यक्त केली़ 
भुलाभाई देसाई रोडवर गुरुवारी खोदकामामुळे फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली असून उद्यार्पयत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे उपायुक्त रमेश बांबळे यांनी सांगितल़े 
 
अधिकारी मोकाट 
जलवाहिनीला तडा गेल्याप्रकरणी 
त्या रस्त्यावर खोदकाम करणा:या ठेकेदारावर कारवाईचे आदेश पालिकेने दिले आहेत़ मात्र रस्ते विभागाचे अधिकारी यातून नामानिराळे राहण्याची शक्यता आह़े