रस्त्यांतील चौकांचा पसारा घटणार !
By admin | Published: December 9, 2014 10:44 PM2014-12-09T22:44:09+5:302014-12-09T22:44:09+5:30
शहरातील रस्त्यांवर सुशोभीकरणाच्या हेतूने बांधलेल्या चौकांचा आकार मोठा असल्याने त्यांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
Next
भाईंदर : शहरातील रस्त्यांवर सुशोभीकरणाच्या हेतूने बांधलेल्या चौकांचा आकार मोठा असल्याने त्यांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आकार त्वरित कमी करून कमीतकमी मोजमापात ते बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून तसे पत्र खाजगी चौकांचे पालकत्व स्वीकारणा:यांना धाडण्यात आले आहे.
काही वर्षापूर्वी शहरातील बांधकाम व्यावसायिकांना वाहतुकीच्या रस्त्यांतील काही दुभाजक व चौक स्वखर्चाने बांधण्यास अनुमती दिली आहे. यामागे पालिकेचा कोणताही खर्च न करता सुशोभीकरणाचा हेतू होता. या दुभाजक व चौकांत छोटी झाडे लावण्याच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. सुरुवातीला झाडांची कल्पना अमलातही आणली. पुढे त्या हिरवळीकडे दुर्लक्ष केल्याने तेथे केवळ संबंधितांच्या नावांच्या पाटय़ा झळकत राहिल्या. त्यांचे पालकत्व स्वीकारलेल्या अनेक बांधकाम व्यावसायिकांनी या चौकांचा आकार वाढवून त्या माध्यमातून आपल्या विकासक कंपनीची जाहिरात करण्यास सुरुवात केली.
सुशोभीकरण व बांधकामाचा खर्च वाचल्याने पालिकेने त्या जाहिरातींकडे दुर्लक्ष केले. परंतु, शहरातील दिवसागणिक वाढत्या वाहतुकीला या अवास्तव आकारांच्या चौकांचा अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे अगोदरच शहरातील वाहतुकीचे रस्ते अपुरे पडत असताना वाहतूककोंडीची समस्याही डोके वर काढत आहे. यामुळे पोलिसांच्या वाहतूक शाखेला तारेवरची कसरत करावी लागते. या चौकांचा अवास्तव आकार कमी करण्यासाठी त्यांनी पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्याची दखल घेऊन पालिकेच्या बांधकाम विभागाने चौकांचे पालकत्व स्वीकारलेल्या बांधकाम व्यावसायिकांना चौकांचा आकार कमी करण्याबाबत कळविले. त्यात चौकांचा अवास्तव आकार अतिक्रमण असल्याचा दावा करून त्यावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी पालिकेने त्यांना ते अतिरिक्त बांधकाम त्वरित हटविण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. (प्रतिनिधी)
4या चौकांचे पालकत्व पाच नामांकित बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले आहे. त्यातील मेडतिया बिल्डरने दीपक हॉस्पिटल, सोनम बिल्डरने गोल्डन नेस्ट, ओस्तवाल बिल्डरने एस.के. स्टोन, रश्मी बिल्डरने सिल्व्हर पार्क व श्रीजी कन्स्ट्रक्शनने 15क् फूट मार्ग येथे प्रत्येकी एक, अस्मिता बिल्डरने 6 व पालिकेच्या अखत्यारीतील 3 अशा 14 चौकांचा समावेश आहे. त्यांचाच पसारा आव्वाच्यासव्वा आहे.
4याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले की, संबंधित बिल्डरांना त्यांनी सुशोभिकरण केलेल्या चौकांचा आकार सूचना दिल्याप्रमाणो त्वरित कमी करण्याबाबत पत्र पाठविले असून त्यावर लवकर कार्यवाही न झाल्यास पालिका ते तोडणार आह़े