मनोर : भाजपा-सेना सरकारच्या जनहितविरोधी धोरणाच्या निषेधार्थ पालघर जिल्हा काँग्रेस पक्षाकडून सावरखंड गावाच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. अर्धा तास हा रास्ता रोको करण्यात आला. मुंबई-गुजरात महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.माजी मंत्री राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. भाजपा-शिवसेना सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन पाळण्यास सरकारचा नकार, डिझेल व पेट्रोलचे दर ५० टक्के कमी न करता केंद्र सरकारने जनतेची लूट चालवली आहे. राज्यातील १ कोटी ७७ लाख गरिबांची उपासमार, मच्छीमार बांधवाच्या मच्छीमारी हद्दीत ओएनजीसीबाबत अन्यायकारक सर्व्हे, पालघर जिल्ह्यातील रेल्वे कॉरिडोरमुळे हजारो आदिवासी व बागायतदारांच्या जमिनी उद्ध्वस्त होणार आहेत. हे असे अनेक मुद्दे घेण्यात आले आहेत. सहा.पो.नि. मारुती पाटील, मनोर पोलीस ठाणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)
रास्ता रोकोने महामार्ग ठप्प
By admin | Published: February 09, 2015 10:54 PM