Join us

रस्ते निविदा आता आॅनलाइन

By admin | Published: October 07, 2015 2:10 AM

मुंबई महापालिकेच्या महापौर स्रेहल आंबेकर यांनी महापालिकेच्या रस्ते कंत्राटामधील घोटाळ््याची चौकशी करण्याचे पत्र पालिका आयुक्तांना दिल्याचे उघड होताच रस्ते घोटाळ््याची

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर स्रेहल आंबेकर यांनी महापालिकेच्या रस्ते कंत्राटामधील घोटाळ््याची चौकशी करण्याचे पत्र पालिका आयुक्तांना दिल्याचे उघड होताच रस्ते घोटाळ््याची चर्चा महापालिकेत सुरु झाली होती. घोटाळ््याच्या चर्चेला पूर्णविराम देण्यासह रस्त्यांची कामे अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी महापालिका आयुक्तांनी रस्ते बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्णपणे ह्यआॅनलाईनह्ण पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.आतापर्यंत इएमडी (अर्नेस्ट मनी डिपॉझीट) व एएसडी (एॅडीशनल सिक्युरिटी डिपॉझीट) यासाठी कंत्राटदारांना संबंधित रकमेच्या डिमांड ड्राफ्टची स्कॅन कॉपी / छायाप्रत देणे बंधनकारक होते. ही माहिती न दिल्यास त्यांची निविदा उघडण्यात येत नव्हती. आता ही प्रक्रिया रद्दबातल करण्याचा निर्णय घेतला आहे.रस्ते कामाच्या निविदा आॅनलाइन केल्याने निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित अर्जदाराला कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष कागद महापालिकेकडे सादर करावा लागणार नाही. त्यामुळे निविदेचा तपशिल व निविदा भरणाऱ्या अर्जदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय राहणार आहे. त्याचबरोबर निविदा अर्ज करण्यासाठी जो कालावधी निश्चित करण्यात आला असेल, त्या कालावधीत इंटरनेटमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, याबाबतची सर्व काळजी घेण्याचे आदेशही आयुक्तांनी महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागास दिले आहेत. रस्त्यांच्या कामात गुणवत्ता जपली जावी यासाठी रस्त्यांच्या कंत्राटांमध्ये गुणवत्ता नियंत्रण अभियंत्यांची नेमणूक करणे संबंधित कंत्राटदाराला बंधनकारक करण्यात आले आहे. कंत्राटदाराद्वारे नेमण्यात येणाऱ्या संबंधित अभियंत्याकडे स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी (बी.ई., सिव्हील) असण्यासोबतच रस्ते बांधकामाचा किमान १० वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक करण्यात आले आहे.गुणवत्ता नियंत्रण अभियंत्याची नेमणूककंत्राट २५ कोटी ते ५० कोटी असल्यास या कंत्राटासाठी एका गुणवत्ता नियंत्रण अभियंत्याची नेमणूक करणेही बंधनकारक आहे. मूल्य ५० ते १०० कोटी असल्यास २ अभियंते तर त्यापुढील प्रत्येक ५० कोटींसाठी अतिरिक्त अभियंत्यांची नेमणूक करावी.निविदा प्रक्रियेमध्ये अधिकाधिक कंत्राटदारांना सहभाग नोंदविता यावा, कंत्राटदाराची ओळख गोपनीय राहावी, या दृष्टीने संपूर्ण निविदा प्रक्रिया ह्यआॅनलाईनह्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.