वानखेडेवरील ‘आयपीएल’ सामन्यांसाठी रस्ते वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 06:13 AM2023-04-09T06:13:03+5:302023-04-09T06:13:34+5:30

वानखेडे स्टेडियमवर आयपीएल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

Road traffic changes for IPL matches mumbai | वानखेडेवरील ‘आयपीएल’ सामन्यांसाठी रस्ते वाहतुकीत बदल

वानखेडेवरील ‘आयपीएल’ सामन्यांसाठी रस्ते वाहतुकीत बदल

googlenewsNext

मुंबई :

वानखेडे स्टेडियमवर आयपीएल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेक्षकांची आणि वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियोजनामध्ये बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. 

आयपीएलच्या सामन्यांना मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी स्टेडियम परिसरात होत असते. या सर्व या सर्व पार्श्वभूमीवर वाहतुकीचे बदल करण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त गौरव सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार ८, १६, २२, ३० एप्रिल आणि  ९, १२, २१ मे रोजी शहरात आयपीएल सामने होणार आहेत. सामन्यांच्या दिवशी दुपारी १२ ते रात्री ११. ५५ पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये वानखेडे स्टेडियम परिसरात पार्किंग निर्बंध, सी रोडवर उत्तर बाजू एन. एम. रोडच्या जंक्शनपासून ई रोडच्या जंक्शनपर्यंत (गरज भासल्यास), डी रोडवर एन. एम. रोडच्या जंक्शनपासून ई रोडच्या जंक्शनपर्यंत, ई रोडवर डी रोडच्या जंक्शनपासून सी रोडपर्यंत, एफ रोडच्या जंक्शनपासून ई कॉमरोड जंक्शनपर्यंत, जी रोडवर दक्षिण बाजू एन. एम. रोड जंक्शनपासून ई कॉमरोड जंक्शनपर्यंत (गरज भासल्यास), ई क्रॉस रोडवर एफ रोडच्या जंक्शनपर्यंत, एन. एम. रोडवर (दक्षिण व उत्तर वाहिनी) मफतलाल बाथ सिग्नल ते एअर इंडिया जंक्शनपर्यंत असणार आहेत.

असे आहेत वाहतुकीतील बदल
वन वे वाहतूक एन.एस. येथील जंक्शनपासून वाहनांच्या वाहतुकीसाठी डी रोड एकेरी (पश्चिम ते पूर्वेकडे) असेल. रोड (मरीन ड्राइव्ह) आणि ई आणि सी रोडच्या जंक्शनच्या दिशेने.

ई रोडच्या जंक्शनपासून एन. एस.च्या जंक्शनकडे जाण्यासाठी सी रोड हा एकेरी (पूर्वेकडून पश्चिमेकडे) वाहनांच्या वाहतुकीसाठी असेल. रोड (मरीन ड्राइव्ह).

डी रोडच्या जंक्शनपासून सी रोडच्या जंक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी ई रोड एकमार्गी (दक्षिण बाउंड) असेल.

Web Title: Road traffic changes for IPL matches mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई