‘आयुक्त दडवताहेत रस्ते घोटाळा अहवाल’

By admin | Published: October 11, 2016 06:34 AM2016-10-11T06:34:42+5:302016-10-11T06:34:42+5:30

शिवसेना आणि भाजपाने मिळून मुंबई रस्ता घोटाळा केला आहे. युतीचे नेते या घोटाळ्यात अडकल्यामुळेच महापालिका आयुक्तांनी

'Roadmap scam report' | ‘आयुक्त दडवताहेत रस्ते घोटाळा अहवाल’

‘आयुक्त दडवताहेत रस्ते घोटाळा अहवाल’

Next

मुंबई : शिवसेना आणि भाजपाने मिळून मुंबई रस्ता घोटाळा केला आहे. युतीचे नेते या घोटाळ्यात अडकल्यामुळेच महापालिका आयुक्तांनी रस्ते घोटाळ्याचा अहवाल अद्याप पालिकेच्या पटलावर ठेवला नसल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी सोमवारी केला.
आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वाघमारे म्हणाले की, महापालिकेत रस्ते घोटाळा, नालेसफाई घोटाळा, कचरा घोटाळा आणि आता टॅबेलेट घोटाळाही झाला आहे. या टॅबेलेट घोटाळ्याचे मार्केटिंग आदित्य ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे यासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेत त्यांचेही नाव टाकावे, अशी विनंती काँग्रेसने याचिकाकर्त्यांना केली असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Roadmap scam report'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.