मुंबईतील रस्त्यांचा ‘स्ट्रीटस्केप रिडेव्हलपमेंट’अंतर्गत होणार विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:05 AM2021-02-10T04:05:27+5:302021-02-10T04:05:27+5:30
नियोजनबद्ध आराखड्याची रचना; दादर, एल्फिन्स्टन, परळ विभागातील रस्त्यांवर विशेष लक्ष सुरक्षा आणि सुरळीत प्रवासावर भर ३ कि.मी.हून अधिक लांबीचा ...
नियोजनबद्ध आराखड्याची रचना; दादर, एल्फिन्स्टन, परळ विभागातील रस्त्यांवर विशेष लक्ष
सुरक्षा आणि सुरळीत प्रवासावर भर
३ कि.मी.हून अधिक लांबीचा पादचारी मार्ग
सायकल ट्रॅकची सोय
आसनव्यवस्था, खेळण्यासाठी जागा, कलाकृतींनी सुशोभित ‘पब्लिक कम्युनिटी पार्क’ची उभारणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहतूक व्यवस्थेला गती मिळावी, प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी खासगी आणि शासकीय व्यावसायिक केंद्र, शाळा असणाऱ्या दादर, एल्फिन्स्टन आणि लोअर परळ विभागात स्ट्रीटस्केप रिडेव्हलपमेंट हा प्रकल्प राबविला जात आहे. ब्लॅकस्टोनच्या रिअल इस्टेस्ट प्लॅटफॉर्म न्यूक्लिअस ऑफिस पार्कद्वारे या प्रकल्पांतर्गत रस्त्यांच्या नियोजनबद्ध आराखड्याची रचना करण्यात येत आहे.
येथील प्रकल्पांतर्गत पादचाऱ्यांसाठी ३ किलोमीटरहून अधिक लांबीच्या पादचारी मार्गाची रचना करण्यात येत आहे. सायकल ट्रॅक उभारण्यात येत असून, या प्रकल्पांतर्गत ‘पब्लिक कम्युनिटी पार्क’ची रचना करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाखाली उभारण्यात येणाऱ्या या पार्कमध्ये आसनव्यवस्था, खेळण्यासाठी मोकळी जागा, व्यायामासाठीची साधने यांची सोय असेल. सुंदर कलाकृती आणि प्रकाश नियोजनाने हे पार्क सुशोभित केले जाईल. डिसेंबर २०२० पासून या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्याचे बांधकाम मे २०२१ पर्यंत पूर्ण करून नागरिकांसाठी हा प्रकल्प खुला होण्याची शक्यता आहे.
----------------------
पर्यावरणमंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी नुकताच याचा आढावा घेतला. ते म्हणाले, पायाभूत सुविधांचे जे प्रकल्प केले जातात त्या प्रकल्पांना सहकार्य मिळत असल्याचे पाहून आनंद झाला आहे.
----------------------
पार्कचे सीईओ कासीर परवेझ म्हणाले, परिसरात काम करणाऱ्यांना चांगल्या सुखसोयी मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. यामुळे मुंबईकरांचे जीवनमान अधिक दर्जेदार होईल.
----------------------
ब्लॅकस्टोनचे मुख्य तुहीन पारीख म्हणाले, हे प्रकल्प उभारताना पर्यावरणाचा विचारही केला जात आहे.