वसईतील रस्ते ठरणार निवडणूक प्रचारात बाधा

By admin | Published: January 11, 2015 11:37 PM2015-01-11T23:37:02+5:302015-01-11T23:37:02+5:30

वसई ग्रामीण भागातील भाताणे व तिल्हेर जि.प.गटातील रस्त्याची अवस्था बिकट असल्यामुळे या भागात प्रचार करणे सर्व पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे.

The roads in Vasai would be hampered by the election campaign | वसईतील रस्ते ठरणार निवडणूक प्रचारात बाधा

वसईतील रस्ते ठरणार निवडणूक प्रचारात बाधा

Next

पारोळ : वसई ग्रामीण भागातील भाताणे व तिल्हेर जि.प.गटातील रस्त्याची अवस्था बिकट असल्यामुळे या भागात प्रचार करणे सर्व पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे. या खराब रस्त्यामुळे पक्षाच्या प्रचाराचे गणितही बिघडणार आहे.
भाताणे व तिल्हेर जिल्हा परिषद गट हे दोन्ही ग्रामीण वसईमध्ये येत आहेत. त्याप्रमाणे या दोन्ही गटात आदिवासी मतदारांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी आधुनिक प्रचार यंत्रणा वापरणे योग्य ठरणारे नाही. त्यासाठी पक्षांनी या भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक खेड्यापाड्यावर प्रचाराला जाण्यासाठी रस्तेही सुस्थितीत हवेत. तरच कमी वेळात प्रचार होईल पण भालीवली, भाताणे, उसगाव, मेढे, कळशोण, पारोळ, तिल्हेर, तिल्हेर बुरूडपाडा, भिनार या गावादरम्यान जाण्यासाठी असणारे रस्ते खराब झाल्याने व भालीवली ते गणेशपुरी रस्त्याचे काम चालू असल्यामुळे अगोदर वेळेचे नियोजन करून प्रचाराचा रथ या सर्व रस्त्यावर चालवणे पक्षांना डोकेदुखी ठरणारे आहे. त्याचप्रमाणे प्रचार यंत्रणात मोठ्या प्रमाणात काढण्यात येणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनांच्या रॅलींचे आयोजन करूनही पक्षांना कठीण ठरणारे आहे.
(वार्ताहर)

Web Title: The roads in Vasai would be hampered by the election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.