Join us

रस्ता संपेल तिथे शौचालय बांधणार

By admin | Published: January 20, 2015 1:13 AM

वाहतूक पोलिसांच्या कात्रीतून सुटका करण्यासाठी रस्त्याच्या टोकाला असे शौचालय बांधण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे़

शेफाली परब -मुंबईनोकरी अथवा बाजारहाटासाठी घराबाहेर पडलेल्या महिलावर्गाची सार्वजनिक शौचालयांअभावी प्रचंड गैरसोय सुरू आहे़ मात्र जागेअभावी लांबणीवर पडलेला शौचालयांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी पालिका प्रशासनाने शक्कल लढवली आहे़ वाहतूक पोलिसांच्या कात्रीतून सुटका करण्यासाठी रस्त्याच्या टोकाला असे शौचालय बांधण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे़रस्ते अथवा पदपथावर कोणतेही बांधकाम करू नये, असे रस्ते विभागाचे परिपत्रक आहे़ तसेच वाहतूक पोलिसांकडूनही परवानगी मिळणे आवश्यक असल्याने सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामांना मोठा फटका बसला होता़ त्यामुळे रस्ता संपतो त्या टोकालाच महिलांसाठी शौचालय बांधण्याचा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागाने तयार केला आहे़ या प्रस्तावाला आयुक्त सीताराम कुंटे यांनी हिरवा कंदील दिल्यास वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळण्यास विलंब होणार नाही़ तसेच रस्ते विभागाच्या नियमांचाही भंग होत नाही़ त्यामुळे प्रस्ताव मंजूर होताच अशा जागा शोधून शौचालय बांधण्याच्या कामाला सुरुवात होईल, असे घनकचरा व्यवस्थापन खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़ 1मुंबईत आजच्या घडीला एक हजार ३५ सार्वजनिक शौचालये असून १३ हजार ४४१ शौचकुपे आहेत़ यापैकी महिलांसाठी केवळ पाच हजार १३६ शौचकुपे उपलब्ध आहेत़2घनकचरा व्यवस्थापन खात्याने २४ जानेवारी २०१३ मध्येच परिपत्रक काढून शौचालयांसाठी जागा शोधण्याची सूचना सर्व विभाग कार्यालयांना केली होती़3मात्र मुंबईत अशी जागाच सापडत नसल्याचे उत्तर बहुतांशी विभागाने दिल्यामुळे महिलांसाठी शौचालय बांधण्याचा निधी वाया गेला़4राइट टू पी या संघटनेने पालिका प्रशासनाला गतवर्षी धारेवार धरीत महिलांसाठी शौचालय बांधण्यास भाग पाडले आहे़