Join us  

रस्त्यांवर ४५० कोटींची खैरात

By admin | Published: March 15, 2016 12:51 AM

निवडणुकांचे पडघम वाजू लागताच रस्त्यांच्या डागडुजीसाठी मोठा निधी खर्च करण्याचे संकेत मिळत आहेत. ठेकेदार पालिकेची तिजोरी लुटत असल्याने त्यांना बाहेरचा

मुंबई : निवडणुकांचे पडघम वाजू लागताच रस्त्यांच्या डागडुजीसाठी मोठा निधी खर्च करण्याचे संकेत मिळत आहेत. ठेकेदार पालिकेची तिजोरी लुटत असल्याने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची कारवाई एकीकडे सुरू आहे़ त्याचवेळी तब्बल ४५० कोटींच्या रस्त्यांच्या कामांची निविदा मागवीत ठेकेदारांचे चांगभले करण्याचा चंग शिवसेना-भाजपा युतीने बांधल्याचे दिसत आहे़गेल्या काही वर्षांमध्ये केलेली रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याचे उजेडात आल्यानंतर ४० ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाईही सुरू झाली़ रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह असतानाच पुन्हा नवीन कामे हाती घेण्यात येत आहेत. उपनगरांतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण व डांबरीकरणासाठी ४५० कोटी रुपयांचे कंत्राट काढण्यात आले आहे़रस्त्यांची चौकशीपाच कोटींवरील २१८ रस्त्यांची तपासणी करून चौकशी सुरू करण्यात आली आहे़ त्यातील ३५ रस्त्यांची प्राथमिक तपासणी झाली आहे़ याचा अहवाल उपायुक्त वसंत प्रभू व दक्षता प्रमुख अधिकारी शीतलाप्रसाद कोरी यांच्या चौकशी समितीने तयार केला आहे़ यामध्ये सात रस्त्यांच्या कामांत अनियमितता असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे़ हा अहवाल अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना सादर करण्यात आला आहे़ठेकेदार व त्यांना दिलेली कामे..१०४ कोटीवांद्रे ते सांताक्रूझ परिसर आणि अंधेरी पूर्व विभागात नऊ रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण : ठेकेदार वित्राग कन्स्ट्रक्शन९२़३८ कोटीअंधेरी पश्चिम ते दहिसर भागातील नऊ रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण : ठेकेदार एम़ई़ इन्फ्राप्रोजेक्ट प्रा़ लि़७६़९६ कोटीगोरेगाव ते बोरीवली १९ मोठ्या रस्त्यांचे डांबरीकरण : ठेकेदार प्रकाश इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्राप्रोजेक्ट६६़७१ कोटीवांद्रे ते सांताक्रूझ पूर्व आणि पश्चिम, अंधेरी, जोगेश्वरी पूर्व भागातील ४४ छोटे रस्ते : ठेकेदार शाह अ‍ॅण्ड पारीख५४़९४ कोटीवांद्रे ते सांताक्रूझ पूर्व, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम भागातील १७ रस्त्यांचे डांबरीकरण : ठेकेदार आऱ जी़ शाह ४७़३३ कोटीमुलुंडमध्ये २३ रस्त्यांची कामे : ठेकेदार मेसर्स सनराइज स्टोन इंडस्ट्रीज६़२५ कोटी व ०४़१८ कोटीकुर्ला ते मुलुंड १०६ रस्त्यांची कामे : ठेकेदार प्रीती कन्स्ट्रक्शन आणि लॅण्डमार्क कॉर्पोरेशन प्रा़लि़या ठेकेदारांना कंत्राट...प्रकाश इंजिनीअरिंग, वित्राग कन्स्ट्रक्शन, एम़ई़ इन्फ्राप्रोजेक्ट, शाह अ‍ॅण्ड पारीख आदी कंपन्यांना कामे देण्यात येणार आहेत़ तर मुलुंडमधील २३ रस्त्यांची कामे सनराइज स्टोन इंडस्ट्रीजने घेतली आहेत़ वांद्रे ते सांताक्रूझ पूर्व, अंधेरी पूर्व व पश्चिमेकडील १७ मोठ्या डांबरी रस्त्यांची कामे आऱपी़ शाह कंपनीला मिळाली आहेत़ त्याचवेळी ४४ छोट्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे कंत्राट शाह अ‍ॅण्ड पारीख कंपनीला दिले आहे. पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, देवनार येथील ६४ रस्ते दुरुस्तीचे कंत्राट प्रीती कन्स्ट्रक्शनला मिळाले आहे़