सरकारच्या दबावापोटीच वित्त आयोगाचे घूमजाव - विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:02 AM2018-09-21T05:02:32+5:302018-09-21T05:04:23+5:30
केंद्रीय वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबाबत नोंदवलेल्या निरीक्षणांवरून घूमजाव करणे आश्चर्यकारक आहे.
Next
मुंबई : केंद्रीय वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबाबत नोंदवलेल्या निरीक्षणांवरून घूमजाव करणे आश्चर्यकारक आहे. यातून भाजपा-शिवसेना सरकारचा संवैधानिक संस्थांवरील दबाव सिद्ध झाला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
या सरकारविरोधात बोलणाऱ्या राजकीय पक्षांना, कार्यकर्त्यांना, पत्रकारांना, अभ्यासक व विचारवंतांवर दडपशाही करण्याची अनेक उदाहरणे ४ वर्षांत दिसून आली होती. हे सरकार संवैधानिक संस्थांवर देखील दबाव निर्माण करीत असल्याचा आरोप आम्ही अनेकदा केला. आयोगाने केलेल्या घूमजावाने या आरोपांना पुष्टीच मिळाली आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.