Join us

वाशीतील लुटारूला कर्नाटकातून अटक

By admin | Published: December 27, 2015 12:50 AM

हवालाच्या एक कोटी रकमेच्या लुटीप्रकरणी वाशी पोलिसांनी सहाव्या आरोपीला कर्नाटकच्या भटकळ गावातून अटक केली आहे. तो फिर्यादीचा भाचा असून त्यानेच लुटीचा कट रचल्याचे

नवी मुंबई : हवालाच्या एक कोटी रकमेच्या लुटीप्रकरणी वाशी पोलिसांनी सहाव्या आरोपीला कर्नाटकच्या भटकळ गावातून अटक केली आहे. तो फिर्यादीचा भाचा असून त्यानेच लुटीचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून व इतर एका फरार आरोपीच्या घरातून ३३ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे.कर्नाटकच्या भटकळ येथे राहणाऱ्या मोहम्मद सलीम काजिया (५८) यांना पिस्तुलच्या धाकाने लुटल्याची घटना वाशी टोलनाक्यालगत घडली होती. यासंबंधीचा गुन्हा दाखल होताच वाशी पोलिसांनी तीन दिवसांत छडा लावत पाच आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये पंकज खैरनार (३२) व नीलेशकुमार संदानशिव (२८) या दोघा पोलीस उपनिरीक्षकांचा तसेच पोलीस नाईक जनार्दन राजे यांचा समावेश आहे. तिघेही ट्राँबे पोलीस ठाण्याचे कर्मचारी आहेत. भटकळ येथेच राहणाऱ्या सय्यद अल्ताफ याच्याकडून त्यांना काजिया यांच्याविषयी माहिती मिळाली होती. अल्ताफ हा काजियांचा भाचा असून त्यांच्या शेजारीच राहणारा आहे. त्याने मोहम्मद अफसर व कामराज यांच्या मदतीने मुंबईत बलराज व ट्राँबे पोलीस ठाण्यातील तिघांशी संपर्क साधून लुटीचा कट रचला होता. या प्रकरणी पाच आरोपींच्या अटकेनंतर मुख्य सूत्रधार अल्ताफ, अफसर व कामराज यांच्या शोधात वाशी पोलीस होते. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक अजित गोंधळी, उपनिरीक्षक प्रदीप सरफरे, देवीदास पालवे, पोलीस नाईक प्रकाश साळुंखे यांचे पथक भटकळ या गावी रवाना झाले होते.बॉम्बस्फोटांशी संबंधमुंबईत बॉम्बस्फोटांशी संबंध असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या यासीन भटकळ याच्या भटकळ या गावचे फिर्यादी व आरोपी आहेत. त्यामुळे लुटीच्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधात भटकळ गावात जाण्याचे धाडस तपास पथकाला करावे लागले. गुन्हा घडल्यानंतर संपूर्ण गावात त्यांच्या सहभागाची चर्चा झाल्यामुळे आरोपी काहीसा दबकूनच होता. अखेर पथकाने सासुरवाडीबाहेर रात्रभर पहारा देऊन सकाळी त्याला ताब्यात घेतले.