चालत्या बसमधील लुटारूना अटक

By Admin | Published: March 23, 2016 02:57 AM2016-03-23T02:57:08+5:302016-03-23T02:57:08+5:30

चालत्या बसमध्ये वृद्ध इसमाला लुटणाऱ्या चौघा सराईत चोरट्यांना धारावी पोलिसांनी अटक केली. अब्दुल शेख, अमिन कुरेशी, फिरोज खान आणि युसूफ शेख अशी त्यांची नावे आहेत

Robbery arrested on moving bus | चालत्या बसमधील लुटारूना अटक

चालत्या बसमधील लुटारूना अटक

googlenewsNext

मुंबई : चालत्या बसमध्ये वृद्ध इसमाला लुटणाऱ्या चौघा सराईत चोरट्यांना धारावी पोलिसांनी अटक केली. अब्दुल शेख, अमिन कुरेशी, फिरोज खान आणि युसूफ शेख अशी त्यांची नावे आहेत.
धारावी परिसरातील पीएमजीपी कॉलनीत राहणारे वालजी जगदिया (वय ६१) हे सोमवारी सायनवरून १६५ या क्रमांकाच्या बेस्ट बसने धारावीला जात होते. त्यांच्या पाठीमागून चार सराईत पाकीटमार देखील बसमध्ये चढले. बस धारावी परिसरात पोहोचल्यानंतर चारही आरोपींनी त्यांच्या पिशवीवर ब्लेड मारले. हे लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे यातील दोन चोरांनी पळ काढला. बेस्ट चालकाने तत्काळ बस धारावी डेपोमध्ये नेली. धारावी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावरून अब्दुल शेख आणि अमिन कुरेशी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास यातील फिरोज खान आणि युसूफ शेख यांना सायन परिसरात सापळा रचून अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Robbery arrested on moving bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.