भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली चौकात पानपट्टीवाल्यास पोलीस असल्याचे सांगून २००० रुपये घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.माणकोली येथील महेंद्र तिवारी याच्या पानपट्टीवर रविवारी रात्री साडेआठ वाजता शक्ती बादल साठा व सचिन कृष्णा सोनावणे हे दोघे आले. त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे ओळखपत्र दाखवत पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच तिवारी याच्याकडून १५ हजार रुपयांची मागणी करून २ हजार रुपये घेतले. या प्रकरणी शहानिशा केली असता ते तोतया पोलीस असल्याचे समजल्याने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडील दोन हजार रुपये जप्त केले.
तोतया पोलिसांना पकडले
By admin | Published: August 18, 2015 1:48 AM