स्वस्त घरांच्या आमिषातून पनवेलमध्ये लूट

By admin | Published: November 12, 2014 01:04 AM2014-11-12T01:04:59+5:302014-11-12T01:04:59+5:30

स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा:या बोगस बिल्डरांचा पनवेल परिसरात धंदा तेजीत आहे.

Robbery of cheap houses looted in Panvel | स्वस्त घरांच्या आमिषातून पनवेलमध्ये लूट

स्वस्त घरांच्या आमिषातून पनवेलमध्ये लूट

Next
प्रशांत शेडगे - पनवेल
स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा:या बोगस बिल्डरांचा पनवेल परिसरात धंदा तेजीत आहे. ग्राहकांचे पैसे घेऊन पसार झालेल्या बिल्डरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारीचा पाऊस पडत आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसात अशा प्रकारचे फसवणुकीचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. 
शहरालगत सिडकोने  कळंबोली, नवीन पनवेल, कामोठा, खारघर त्याचबरोबर उलवे, तळोजा पाचनंद, करंजाडे  हे नोड विकसित केले. या ठिकाणी भूखंड शिल्लक राहिले नसल्याने आता पनवेल तालुक्यातील आजूबाजूच्या गावात गृह प्रकल्प उभारण्यात येत आहेत. सुकापूर आणि विचुंबे पाठोपाठ आता नेरे, वारदोली, तुराडे, कसळखंड, पाली देवद, चिंध्रन, हरीग्राम, वाजे, चिखले, कोप्रोली या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. सिडको व पनवेल शहरातील घरांच्या किंमती गगनला भिडल्या असल्याने सर्वसामान्यांच्या क्षमतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आपल्या बजेटनुसार शहराच्या बाहेर सदनिका शोधीत आहेत. हीच संधी साधून ग्राहकांना लुटण्याचा धंदा अनेक बिल्डरांनी थाटला आहे.
पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाजूला शेकड जणांनी आपली कार्यालये थाटली आहेत. कमी किंमतीत घरे उपलब्ध असल्याचे जाहिरात करून काही मंडळी ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत. हक्काच्या निवा:यापोटी ग्राहकसुध्दा कायदेशीर पडताळणी न करता संबधीताला पैसे देऊन मोकळे होत असल्याची अनेक उदाहरणो घडली आहेत. हे बिल्डर एखादया शेतक:याला काही ठराविक रक्कम देऊन करार करतात.त्याच ठिकाणी प्रोजेक्टचा फलक लावून वन रूम किचन, वन बिएचके, टु बिएचके दहा लाखांच्या आतमध्ये देण्याचे प्रलोभन दाखवून बुकिंगकरीता पैसे घेतले जातात. नुकतेच अवघ्या तीन लाखांत 45क् चौरस फुटाचे घर असे प्रलोभन दाखवून पैसे घेऊबन पलायन केलेल्या नासीर खान या बांधकाम व्यवसायिकाविरोधात खांदेश्वर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला.अशाच प्रकारचे आणखी चार गुन्हे खांदेश्वर पोलीसांमध्ये दाखल झाले. त्यापैकी काहींना अटक केली असून ग्राहकांकडून आलेल्या तक्रार अर्जाची पडताळणी केली जात आहे.
 
नवीन पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतही बांधकाम व्यवसासिकांकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात आल्या आहेत.सत्यता पडताळून त्यानुसार कारवाई करण्यात येईल. 
- सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक
अनधिकृतपणो बांधकाम करणा:या व्यवसायिकांना नोटीसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई करण्याकरीता सिडकोला पत्रही दिले आहे.
- पवन चांडक, तहसीलदार
 
पनवेल शहर पोलिसांकडेही फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याचबरोबर बिनशेती परवाना, नगररचना विभागाकडून  बांधकाम परवाना तसेच नयनाकडून ना हरकत प्रमाणपत्र न घेता काहीनी इमारती उभ्या केल्या आहेत.
 
बिल्डरांकडून प्रलोभने : आजूबाजुच्या गावामध्ये उभारलेल्या गृह प्रकल्पांची मोठया प्रमाणात जाहिरात बाजी केली जाते. त्यामध्ये विमानतळ, रेल्वस्थानक, द्रुतगती महामार्गाचे प्रलोभन दाखविले जाते. वास्तविक पाहता या प्रकल्पाच्या नावाखाली बिल्डर ग्राहकांची फसवणूक करीत आहेत.

 

Web Title: Robbery of cheap houses looted in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.