भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या कार्यालयावर दरोडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 10:46 AM2018-08-28T10:46:19+5:302018-08-28T11:25:18+5:30

भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या इंडियन ऑइल नगर समोरील कार्यालयावर मध्यरात्री दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

robbery in the office of General secretary of the Bharatiya Kamgar Sena, Jaywant Parab | भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या कार्यालयावर दरोडा 

भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या कार्यालयावर दरोडा 

मुंबई -  भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या इंडियन ऑइल नगर समोरील कार्यालयावर मध्यरात्री दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री ही घटना घडली असून दरोडेखोरांनी कार्यालयातील कपाटे फोडली आहेत. याप्रकरणी डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती परब यांचे समर्थक प्रदीप कुरतडकर यांनी दिली.

डी एन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. पंचनामा झाला नसल्याने चोरट्याने नेमका किती ऐवज लंपास केला आहे, हे लगेच सांगता येणार नाही. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डी एन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी सांगितले.

Web Title: robbery in the office of General secretary of the Bharatiya Kamgar Sena, Jaywant Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.