खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना भलंमोठं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 09:36 PM2020-07-13T21:36:50+5:302020-07-13T22:22:39+5:30

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तब्बल 6 पानी पत्र लिहिलं असून राज्यातील कोरोनाबाधित परिस्थिती आणि नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत.

Robbery of patients from private hospitals, letter of devendra Fadnavis to the Chief Minister | खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना भलंमोठं पत्र

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना भलंमोठं पत्र

Next
ठळक मुद्देविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तब्बल 6 पानी पत्र लिहिलं असून राज्यातील कोरोनाबाधित परिस्थिती आणि नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत.खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट होत असल्याचेही फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णांची होणारी गैरसोय यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकेरेंना पत्र लिहले आहे. आपल्या पत्रातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि विभागीय भागातील कोरोना संदर्भातील परिस्थिती फडणवीस यांनी मांडली आहे. मुंबईतील सरकारी रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असून विलिगीकरण कक्षात ना वेळेवर जेवण मिळते, ना पाणी. तर, दुसरीकडे खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट होत असल्याचेही फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तब्बल 8 पानी पत्र लिहिलं असून राज्यातील कोरोनाबाधित परिस्थिती आणि नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत. 'राज्यातील बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आढळलेली निरीक्षणे, त्यावर राज्य सरकारच्या वतीने तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत हे पत्र लिहित असल्याचे फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले आहे. 

अनलॉकबाबत सरकारची अवस्था सतत गोंधळल्यासारखी आहे, सरकारने केलेल्या घोषणा आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती पाहिल्यानंतर महाराष्ट्रासमोरील कोरोनासंबंधित विद्यमान समस्या कळविण्यासाठी आपण हे पत्र लिहिल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी यापूर्वीही अनेकदा मुख्यमंत्र्याशी पत्रव्यवहार करुन कोरोनावर उपाययोजना करण्याचे सूचवले आहे. तर, मुंबई केईएम, नायर, सेंट जॉर्ज हॉस्पीटल, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, एमएमआर क्षेत्रातील पनवेल, नवी मुंबई, उल्हानगर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मीरा भाईंदर तसेच, नाशिक, मालेगाव, जळगाव आणि औरंबाद जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर, अभ्यास करुन हे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 

Web Title: Robbery of patients from private hospitals, letter of devendra Fadnavis to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.