ड्युटीवरील पोलिसांच्या वॉकीटॉकीवर डल्ला; लॉकडाउनचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 01:02 AM2020-03-30T01:02:55+5:302020-03-30T06:23:52+5:30
औरंगाबाद, सांगलीतून झाल्या गहाळ
- जमीर काझी
मुंबई : राज्यसह देशभरात लॉक डाउनमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असताना कायदा व सुव्यवस्था पोलिसांना अंतर्गत संदेश वहनाच्या महत्त्वपूर्ण कामासाठी अत्यावश्यक साधन असलेली वाँकीटॉवरचं डल्ला मारल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.
औरंगाबाद व सांगली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अखत्यारितीतील दोन वाँकीटाँकी बँटरी व अँन्टेनासह गहाळ झाल्या आहेत. स्थानिक स्तरावर शोध घेऊनही अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे त्याचा शोध राज्यात सर्वत्र करण्यात येत आहे .
औरंगाबाद शहर व सांगली वाहतूक शाखेतील पोलीस सुरळीत वाहतुक व्यवस्थेचे नियोजन करीत असताना त्यांच्याकडून या वाँकीटाँकी हरविल्याआहेत. कोणातरी खोडकर नागरिकांनी त्या तेथून गायब केल्या असल्याने पोलिसांना त्या मिळाल्या नसल्याने त्याच्या शोधासाठी राज्यभरातील पोलिसांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत . औरंगाबादच्या वाळूंज येथून १९ मार्चला तर सांगली शहरातून २० मार्चला गहाळ झाली,दोन्हीच्या समवेत बँटरी व अँन्टेनाही असल्याचे सूत्रांकडून सांगणात आले.
औरंगाबाद वाळूंज येथून
गेलेल्या वाँकीटाँकीचा क्रमांक व्हीएचएफ डब्ल्यू/टी मोटोरोला जीपी३३९ हा आहे,तर सांगलीतील व्हीएचएफएचबी डब्ल्यू/टी हेटरा पीडी ७८८ ही हरविली आहे. त्या पुन्हा मिळो अथवा न मिळो त्या ज्या अंमलदाराकडून गहाळ झाल्या त्याच्यावर निष्काळजी व हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल लवकरच कारवाई केली जाणार आहे.
...तर ती यंत्रणा निरुपयोगी
वाँकीटाँकीच्या माध्यमातून गोपनीय व महत्त्वपूर्ण माहिती समजू शकत असली तरी त्याची बँटरी जास्तीजास्त ८ तास चालू शकते,त्यानंतर तिला पुन्हा चार्जिग करावे लागते, त्यासाठी ठराविक स्वरुपाचा सेटबाँक्स लागतो. त्यामुळे गहाळ झालेल्या वाँकीटाँकी बंद पडल्यानंतर नागरिकांना त्याचा उपयोग होणार नसल्याने नसती कटकट नको म्हणून घेणायार्ने त्या निर्जन ठिकाणी ,शेतात,तलाव,विहिरीत टाकून दिल्या असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.