Join us

रिक्षा चालकांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:14 AM

मुंबई : मीटरमध्ये फेरफार केल्यास रिक्षा चालकांवर कारवाई होते. मात्र, तरीही काही रिक्षाचालक सुधारत नाहीत. एका प्रवाशाने सांगितले ...

मुंबई : मीटरमध्ये फेरफार केल्यास रिक्षा चालकांवर कारवाई होते. मात्र, तरीही काही रिक्षाचालक सुधारत नाहीत. एका प्रवाशाने सांगितले की, मालाड ते गोरेगाव जाताना ८४ रुपये झाले, तर येताना ८९. सारखे अंतर आणि वाहतूक कोंडी नसताना पैसे जास्त येतात. रिक्षा मीटरमध्ये फेरफार असून, त्यावर कारवाई व्हावी.

अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

मुंबई : चेंबूर येथे छेडानगर भागात सर्व्हिस रोडवर अतिक्रमण झाले आहे. सातत्याने रिक्षा आणि दुचाकी उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांचे १५ ते २० मिनिटे वाया जात आहेत.

दुचाकीस्वारांना आवरा

मुंबई : सायन रुग्णालय येथून कुंभारवाड्याच्या दिशेने जाताना सायन उड्डाणपुलावरून अनेक दुचाकीचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवत आहेत. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली.