गंगनम स्टाईलवर नाचणारा रोबो आणि पोहणारा रोबो मासा

By admin | Published: December 27, 2015 01:25 AM2015-12-27T01:25:30+5:302015-12-27T01:25:30+5:30

गंगनम स्टाईल या प्रसिद्ध नृत्याच्या तालावर नाचणारे रोबो आणि पोहणाऱ्या कृत्रिम माशांना पाहण्याची संधी आज मुंबईकरांना आयआयटी टेकफेस्टच्या निमित्ताने मिळाली. खऱ्याखुऱ्या

Robo dancer and swimmer Robbo Masa on Gangnam Style | गंगनम स्टाईलवर नाचणारा रोबो आणि पोहणारा रोबो मासा

गंगनम स्टाईलवर नाचणारा रोबो आणि पोहणारा रोबो मासा

Next

मुंबई : गंगनम स्टाईल या प्रसिद्ध नृत्याच्या तालावर नाचणारे रोबो आणि पोहणाऱ्या कृत्रिम माशांना पाहण्याची संधी आज मुंबईकरांना आयआयटी टेकफेस्टच्या निमित्ताने मिळाली. खऱ्याखुऱ्या माशाप्रमाणे पोहणाऱ्या या रोबो माशाला पाहून तरुण अक्षरश: थक्क झाले. तर गंगनम या प्रसिद्ध नृत्याच्या तालावर नाच करणाऱ्या रोबोलाही या फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घातलेला आशिया खंडातील सगळ्यात मोठा असा आयआयटीचा ‘टेक फेस्ट’ दरवर्षी नवनवे तंत्रज्ञान घेऊन अवतरत असतो. यंदाही आयआयटी टेकफेस्टमध्ये टेक्नॉलॉजीची हटके धूम पाहायला मिळाली. शनिवारी सुरू झालेल्या
या फेस्टला बच्चेकंपनीपासून तरुणाईने गर्दी केली आणि रोबोज्ची मजा लुटली. टेक फेस्ट २०१५ साठी भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात विविध देशांनी तयार केलेले रोबोज् पाहायला मिळाले. बांगलादेश, कोरिया, नेदरलँड, स्वित्झर्लंड, हंगेरी, आॅस्ट्रिया, इस्रायल या देशांनी प्रदर्शनात रोबोज मांडले. यातील कोरिया देशाने तयार केलेले रोबोज प्रदर्शनाचे आकर्षण ठरले. गंगनम स्टाईलवर नाचणाऱ्या रोबोजना पाहून अनेकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. तसेच या वेळी सगळ्यांनाच आकर्षून घेतले ते नासाच्या ‘चांद्रबोट’ या रोबोने. चंद्र आणि मंगळ मोहिमेसाठी भविष्यात वापरल्या जाणाऱ्या या रोबोला बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. याव्यतिरिक्त किलोबॉट, पोकर रोबोट, रेस्क्यू अ‍ॅण्ड रिलीफ रोबोट, मिनीरोबोट हे रोबोही आकर्षण ठरले. या वेळी मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अनेक स्पर्धाही घेण्यात आल्या. यातील रोबो वॉर, कार रेसिंग ही स्पर्धा अनेकांच्या पसंतीस उतरली.
आयआयटी टेक फेस्टसाठी
अनेक ठिकाणी पुठ्ठ्यांपासून तयार केलेली कार्टुन कॅरेक्टर उभारण्यात आली होती. यात मु्ख्यत्वे बेन टेन, पिकाचू आणि अन्य टुनामी पात्रांचा समावेश होता. तर लहान मुलांना आवडणाऱ्या बॅटमॅन आणि सुपरमॅन हवेत उडत आहेत असा माहोल तयार करण्यात आला होता. (प्रतिनिधी)

सोलर चार्जर : कॅम्पसमध्ये सौरऊर्जेचा वापर करून तयार केलेले मोबाइल चार्जर पॅनल ठेवण्यात आले होते. अनेकांनी मोबाइल चार्ज करण्यासाठी या चार्जरचा उपयोग केला. यात सौरऊर्जेचा वापर करून एकाच वेळी १५ ते २० मोबाइल चार्ज करता येऊ शकत होते.

तबकडी, एलियन आणि बरंच काही : एलईडी लाइट्सचा वापर करून अवकाश तयार केले होते. हवेत तरंगणाऱ्या परग्रहावरील तबकड्या आणि एलियन अगदी खरेखुरे असल्याचा भास होत होता.

Web Title: Robo dancer and swimmer Robbo Masa on Gangnam Style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.