Join us

भूमिगत पाइपलाइनच्या पाहणीसाठी ‘रोबो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2016 4:00 AM

कालबाह्य आणि झिजलेल्या पाइपलाइनमुळे मौल्यवान पाणी वाया जाते. अचूक पाहणी व्यवस्थेच्या अभावामुळे हा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. यावर उपाय शोधत विवेकानंद एज्युकेशन

मुंबई : कालबाह्य आणि झिजलेल्या पाइपलाइनमुळे मौल्यवान पाणी वाया जाते. अचूक पाहणी व्यवस्थेच्या अभावामुळे हा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. यावर उपाय शोधत विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज् इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग आणि सोमय्या महाविद्यालयातील दोन भावांनी मिळून ‘रोबो’ची निर्मिती केली आहे.इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगच्या तृतीय वर्षाला असलेला विद्यार्थी रोहित कश्यप आणि सोमय्या कॉलेजमधील विद्यार्थी राहुल कश्यप यांनी इन-पाइप पाहणी करण्यासाठी ‘सेपर - सेमी-आॅटोनॉमस पाइपलाइन एक्स्प्लोरेशन रोबो’ तयार केला आहे.सध्याच्या पाइपलाइन भूमिगत आहेत आणि पारंपरिक पाहणी पद्धतीद्वारे त्यांचे मूल्यमापन सहजपणे करणे शक्य नाही. या पाइपलाइन चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी आणि भविष्यातील संकट टाळण्यासाठी त्यांची नियमितपणे पाहणी करणे आवश्यक आहे. मुंबईतील पाइपलाइनचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे (बीएमसी) विशिष्ट यंत्रणा असून, त्यामध्ये रस्त्याच्या जाळ्याखाली असलेल्या पाण्याचा पाइपलाइनमधील गळती शोधण्यासाठी साउंडिंग रॉड घेतलेले ‘साउंडिंग मुकादम’ फेऱ्या मारतात. पाइपची पाहणी करण्यासाठी उपाय म्हणून आणि सध्याचे नुकसान व झीज यांचे प्रमाण नोंदविण्यासाठी, जेणेकरून पाइपलाइन व्यवस्थेचे आयुर्मान वाढविण्यासाठी महत्त्वाची धोरणे आखण्यासाठी मदत होईल, ‘सेपर’ची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा उपयोग, तेल व वायू वाहून नेणाऱ्या पाइपलाइनची कार्यक्षमता तपासण्यासाठीही करता येऊ शकतो. (प्रतिनिधी)- ‘सेपर’ म्हणजे आधुनिक पाइपलाइन व्यवस्थेची स्थिती तपासण्यासाठी व नोंदवण्यासाठी शोधलेला परिपूर्ण व किफायतशीर उपाय आहे. ढगाळ स्थितीमध्ये इमेजेस घेण्याच्या आणि यूएव्हीने समाविष्ट करता येईल अशा अंतराच्या बाबतीत, पाइपलाइनची पाहणी करण्याच्या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या या प्रकल्पामध्ये व्हीईएसआयटीचे प्रा. अभिजित शेटे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प विकासाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यात मोलाचे मार्गदर्शन केले. कालबाह्य तंत्रज्ञानावर ‘सेपर’चा नवा पर्यायया तंत्रज्ञानांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागतो. नवी तंत्रज्ञान गॅझेट आणि मोठ्या दबावाखाली काम करण्याची सिद्ध झालेली क्षमता असलेला ‘सेपर’ सध्याच्या कालबाह्य तंत्रज्ञानाला तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य पर्याय ठरू शकतो, असे रोहित कश्यप यांनी स्पष्ट केले.‘सेपर’ राष्ट्रीय स्तरावर सेमी फायनलमध्ये दाखल‘सेपर’ने नियंतर या तांत्रिक ज्ञान वापरून प्रत्यक्ष जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या नॅशनल इन्स्ट्रूमेंट्सने आयोजित केलेल्या वार्षिक स्टुडंट डिझाइन काँटेस्टच्या सेमी-फायनल फेरीमध्ये प्रवेश केला आहे.केवळ पुस्तकी ज्ञान नको; कार्यक्षमेतवर अधिक भरप्रत्यक्ष आयुष्यातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही. कार्यात्मक क्षमता वाढविण्यावर भर देत असताना, विद्यार्थ्यांना विश्वासार्ह पर्याय विकसित करण्यासाठी आपले ज्ञान व कौशल्य वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे आहे. तरुणांना मार्गदर्शन करणे, त्यांची सर्जनशील क्षमता योग्य दिशेला वळवणे आणि शास्त्रीय बाबतीत सुसज्ज अशा प्रोफेशनल्सची निर्मिती करणे, ही सक्षम आणि स्वयंपूर्ण भारत घडविण्याची गुरुकिल्ली आहे.- डॉ. जे. एम. नायर, प्राचार्य, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज् इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी