रेल्वे ट्रॅक, रस्त्यांखालील कल्व्हर्टच्या सफाईसाठी रोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 02:37 AM2019-01-23T02:37:39+5:302019-01-23T02:37:45+5:30
रेल्वे ट्रॅक आणि रस्त्याखालील कल्व्हर्टमधील गाळ साफ होत नसल्याने पावसाळ्यात पाणी तुंबते. याचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसत असल्याने मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होते.
मुंबई : रेल्वे ट्रॅक आणि रस्त्याखालील कल्व्हर्टमधील गाळ साफ होत नसल्याने पावसाळ्यात पाणी तुंबते. याचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसत असल्याने मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे कल्व्हर्टच्या अरुंद जागेत सहजपणे जाऊन साफसफाई करण्यासाठी महापालिकेने अमेरिकन रोबो मागवला आहे. या रोबोमार्फत एप्रिल महिन्यात कल्व्हर्टची सफाई करण्यात येणार आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या व व रस्त्यांच्या खाली अनेक ‘कल्व्हर्ट’ (मोरी) आहेत. पर्जन्यजल वाहिन्या खात्याद्वारे या कल्व्हर्टची सफाई पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यांमध्ये केली जाते. या वर्षी प्रथमच कल्व्हर्टची साफसफाई ही ‘रिमोट कंट्रोल’द्वारे नियंत्रित करता येणाऱ्या रोबोद्वारे होणार आहे.
असा असेल रोबो...
कल्व्हर्टच्या सफाईसाठी अमेरिकेतून आयात करण्यात येणाºया रोबो यंत्राची रुंदी व उंची साडेतीन फूट (४२ इंच) असून या यंत्राला असणाºया ३५ अश्वशक्तीच्या इंजिनामुळे एकावेळी तब्बल ७०० किलोपेक्षा अधिक वजनाचा गाळ काढता येणार आहे.
तसेच हे यंत्र ३६० अंशात जागेवरच गोल फिरणारे असल्यामुळे यंत्राची हालचाल अधिक सहज असणार आहे. हे रोबो यंत्र ‘रिमोट कंट्रोल’द्वारे आॅपरेट केले जाणार असल्याने चालकास दूर अंतरावर राहून कल्व्हर्टची साफसफाई करणे शक्य होणार आहे. ज्यामुळे कल्व्हर्टमध्ये असणाºया संभाव्य विषारी
वायूंच्या प्रतिकूल परिणामापासून संबंधित कामगारांचे संरक्षण होणार आहे.
>७०० किलो वजनाचा गाळ काढणार
अमेरिकेतील पश्चिम व्हर्जिनिया येथून हा रोबो आयात करण्यात येणार आहे.
कल्व्हर्टची साफसफाई पालिकेच्या पर्जन्यजल खात्याद्वारे नियमितपणे होत असते. मात्र, बहुतांश कल्व्हर्टची उंची कमी असून आत जाण्यास असणारी जागा अरुंद आहे.
अत्याधुनिक रोबो एकावेळी जास्तीतजास्त ७०० किलो वजनाचा गाळ काढणार आहे. तसेच उंची व रुंदी केवळ ४२ इंच, तर लांबी १२० इंच असून हे यंत्र ३६० अंशात गोल फिरत असल्याने निमुळत्या किंवा अरुंद जागेतही या यंत्राद्वारे साफसफाई करणे शक्य होणार आहे.