रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

By admin | Published: January 14, 2017 07:14 AM2017-01-14T07:14:56+5:302017-01-14T07:14:56+5:30

पुण्यातील लोकमान्य टिळक रुग्णालयात देशातील पहिली रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या शस्त्रक्रियेसाठी

Robotic knees transplant surgery successful | रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

Next

मुंबई : पुण्यातील लोकमान्य टिळक रुग्णालयात देशातील पहिली रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या शस्त्रक्रियेसाठी ब्ल्यू बेल्ट तंत्रज्ञानासह नेविओ पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अमेरिकेत जवळपास ६५ ठिकाणी या रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर शस्त्रक्रियेसाठी केला जातो.
अत्याधुनिक रोबोटिक गुडघे प्रत्यारोपणाचे हे तंत्रज्ञान तरुण पिढीतील रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे. गोल्फ, टेनिस, ट्रेकिंग, सायकलिंग, स्विमिंग यांसारख्या क्रीडा क्षेत्रात कार्यशील असणाऱ्या तरुणाईला संभावणाऱ्या अपघातांसाठी ही शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. तसेच, वृद्ध रुग्णांमध्ये आढळणाऱ्या गुडघेदुखीच्या समस्या लक्षात घेऊन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना उपाय म्हणून हे तंत्रज्ञान ज्येष्ठांसाठी निश्चितच नवसंजीवनी ठरेल, असे मत लोकमान्य टिळक रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक आणि चीफ जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नरेंद्र वैद्य यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच ही रोबोटिक शस्त्रक्रिया भारतात पहिलीच असल्याचा दावा वैद्य यांनी केला आहे.
रोबोटिक असिस्टेड गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यंत वेदनारहित असून रुग्णांची प्रकृती लवकर सुधारते. या शस्त्रक्रियेदरम्यान कमीत कमी रक्तस्राव होतो. शस्त्रक्रियेमुळे हाडांच्या मजबुतीवर परिणाम होत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Robotic knees transplant surgery successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.