मुंबईतील आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये रंगणार ‘रोबोवॉर’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:48 AM2019-12-31T03:48:01+5:302019-12-31T03:48:09+5:30

१० देशांचा सहभाग; २०१७ च्या विजेत्या ‘तानाजी’ला नवीन लूक

'Robovor' to be held at IIT TechFest in Mumbai | मुंबईतील आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये रंगणार ‘रोबोवॉर’

मुंबईतील आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये रंगणार ‘रोबोवॉर’

Next

मुंबई : महाविद्यालयीन तरुणांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये ‘रोबोवॉर’ रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असणारे हे रोबोवॉर मुंबईकरांसाठी खुले असून, यात जगभरातील १० देशांचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेत अव्वल स्थान पटकाविणाºया चमूंना १० लाखांचे पारितोषिक असणार आहे.

पवई येथील आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये ३ ते ५ जानेवारी दरम्यान हे रोबोवॉर रंगणार आहे. यंदाच्या रोबोवॉरमध्ये अमेरिका, ब्राझील यांसारख्या देशांतील विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. त्याचप्रमाणे यंदाच्या रोबोवॉरमध्ये पहिल्यांदाच काही नव्या रोबोंची झलक पाहण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. गाडगेबाबा कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या चाळीस विद्यार्थ्यांच्या संघाने ‘तानाजी’ला नवे रूप दिले आहे. भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हा रोबो तयार केला आहे. यापूर्वी २०१७ साली या रोबोने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याने काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही विजेतेपद पटकावले होते.

१९९८ सालापासून टेकफेस्ट आंतरराष्ट्रीय संकल्पनांवर आधारित तंत्रज्ञान आणि नवयुगाचे पैलू उलगडत आहेत. आशियातील सर्वांत मोठा महाविद्यालयीन महोत्सव म्हणून स्थान मिळविलेल्या या महोत्सवाला दरवर्षी दीड लाख जण भेट देतात. तर या महोत्सवाच्या फेसबुक पेजलाही तीन मिलियन्सहून अधिक लाइक्स आहेत.

४८ संघांमध्ये पाहायला मिळणार लढत
रोबो हे टेकवेड्यांसाठी आकर्षण असते. त्यातच रोबो वॉर पाहणे हे फारच रोमांचक ठरते. या रोबो वॉरमध्ये रोबोंनी केलेले हल्ले, प्रतिहल्ले पाहण्यासाठी गर्दी होत असते. तसेच आपलाच रोबो जिंकावा या दृष्टीने स्पर्धेत सहभागी झालेले आपापल्या रोबोवर प्रचंड मेहनत घेत असतात. अशाच प्रकारे यंदाच्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये हे रोबोवॉर विशेष ठरेल, असा आयोजकांचा दावा आहे. जगभरातील १० देशांतील ४८ संघ या स्पर्धेत आपापले रोबोट घेऊन उतरणार असून, या ४८ संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

Web Title: 'Robovor' to be held at IIT TechFest in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.