Join us

रॉकबँड्सचा देशी तडका!

By admin | Published: November 12, 2014 1:15 AM

रॉक म्युङिाक आणि तरुणाईचे नाते काही वेगळेच असते. देश-विदेशात रॉक बँड्सचे परफॉर्मन्स एन्जॉय करण्याची मोठी क्रेझ पाहायला मिळते.

मुंबई : रॉक म्युङिाक आणि तरुणाईचे नाते काही वेगळेच असते. देश-विदेशात रॉक बँड्सचे परफॉर्मन्स एन्जॉय करण्याची मोठी क्रेझ पाहायला मिळते. तरुणाईची हीच नस ओळखून सोमवारी पुल युवा महोत्सवात 1क् रॉक बँड्सने दमदार परफॉर्मन्स केले. या वेळी पुल युवा महोत्सवात फ्युजन म्युङिाकमध्ये आकंठ बुडालेली 
तरुणाई असा आगळावेगळा योग जुळून आला.
भारतीय आणि पाश्चात्त्य संगीत मिलाफ साधत पुण्याचा हायवे 61, सामवेद, इंडो जिप्सीज, लक्ष्मी बॉम्ब, दर्शन, कलर टेल्स आणि अहमदाबादच्या मेघधनुष या वैशिष्टय़पूर्ण बँड्सने हटके सादरीकरण करीत तरुणाईची मने जिंकली. टाळ, तबल्यापासून गिटार ड्रमसेटर्पयत सर्वच वाद्यांनी रसिकांची वाहवा मिळवली. ‘हायवे 61’ या ग्रुपने सादर केलेल्या सुफी गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात केली, तर सामवेद या ग्रुपने आधुनिक वाद्यांसोबत ‘फ्युजन’ म्युङिाकमध्ये सारेच दंग झाले. 
अहमदाबाद येथून आलेल्या मेघधनुष या पथकाने ‘बॉलीवूड रॉक’ सादर केले. ‘फिल्टर कॉफी’, ‘लक्ष्मी बॉम्ब ब्लास्ट’ आणि ‘कलर टेल्स’ या बँड्सनीही केलेले संगीत आणि चित्र यांचेही सादरीकरण रसिकांच्या मनाला भिडले. ‘हायवे 61’च्या पहिल्याच परफॉर्मन्समधील ‘आदाब अर्ज हैं..’ या गाण्याने प्रेक्षकांची दाद मिळवली. रॉक म्युङिाक हे फक्त इंग्रजी-हिंदीतच असतं, हा समज खोडून काढत मराठी मुलांच्या या रॉकबँड्सने मराठीलाही रॉकमध्ये नेऊन ठेवलं. भाषेचा गोडवा हरवू न देता या मुलांनी साधलेल्या या किमयेमुळे रॉक संगीताचा ग्लोबल दरवाजा मराठीसाठी उघडला गेला. 
रॉकबँड अन् रॉकस्टार ही संकल्पना आपल्याकडे प्रामुख्याने परिचित आहे ती पाश्चिमात्य संदर्भातून. आपल्याकडे या संगीताची माफक उदाहरणो असली तरी त्या प्रमाणात प्रसिद्धी, पैसा आपल्याकडे पाहायला मिळत नाही. तरीही हळूहळू का होईना रॉक म्युङिाक मराठीतही रुजेल, अशी आशा या वेळी रॉकबँड्सच्या सदस्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
 
भेंडे यांना पु.लं़ची शाबासकी!
मराठी संगीत क्षेत्रत रॉक संगीताची ङिांग आणि जादू लोकांर्पयत पोहोचवण्याचे काम नंदू भेंडे यांनी केले. त्या नंदू भेंडे यांना पहिली शाबासकी पु.ल. देशपांडे यांनी दिली होती. संगीताचा हा नवा प्रकार मराठीत येतो आहे, त्याबद्दल त्यांना विशेष कुतूहल होते.
 
मराठी रॉकसाठी मार्केट खुले होतेय, ही स्वागतार्ह बाब आहे. अशा महोत्सवातून तरुणाईला रॉकबँड्सची जादू अनुभवायला मिळणोही प्रेरणादायीच आहे. त्यामुळे भविष्यातही शासनाने अशा सांस्कृतिक महोत्सवांमध्ये रॉक म्युङिाकलाही स्थान द्यावे, अशी अपेक्षा ‘हायवे 61’चे प्रमुख मोहंमद मुनीम यांनी व्यक्त केली.
 
पु़ल़ युवा महोत्सवात पहिल्यांदाच रॉकबँडसारखा अनोखा उपक्रम राबवल्यामुळे सर्व रॉकबँड ग्रुपने आयोजकांचे आभार मानले. आजचा तरुण खूप उत्साही आहे. त्याच्या अंगी विविध कलागुण आहेत़ त्याला गरज आहे ती फक्त सादरीकरणाची, असे ‘हायवे 61’च्या श्रुती जकाती यांनी सांगितले.
 
दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी पु़ल़ युवा महोत्सवाचे आयोजन केल्यामुळे आयोजकांचे आभार मानले. कोणतेही गाण्याचे शब्द नसताना ते प्रेक्षकांना वाद्याच्या तालावर खेळवत ठेवू शकतात, याची मला पूर्ण खात्री आहे. स्वरचित संगीत हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. रॉकबँडचा कार्यक्रम  घेतल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन आहे, असे पायल तलवार या तरुणीने सांगितले.